×

अनुसूचित जाती, जमातींव्यतिरिक्त कोणत्याही जातींची जनगणना करता येणार नाही

Published On :    21 Jul 2021  By : MN Staff
शेयर करा:


आरएसएसप्रणित केंद्रातील ब्राम्हणी भाजपा सरकारने बाहेर काढले संघिष्ट दात, पुन्हा एकदा ओबीसीला फसवले, ओबीसींनी ओळखून घ्या दुश्मन कोण आहे तो





नवी दिल्ली : ईव्हीएम घोटाळा करून केंद्रातील सत्ता ताब्यात घेणार्‍या आरएसएसप्रणित केंद्रातील ब्राम्हणी भाजपा सरकारने आपले संघिष्ट दात बाहेर काढले आहेत. अनुसूचित जाती, जमातींव्यतिरिक्त कोणत्याही जातींची जनगणना करता येणार नाही असे सांगत त्यांनी पुन्हा एकदा ओबीसीला फसवले आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती देताना सरकारने हा धोरणात्मक निर्णय घेतल्याचा कांगावा केला आहे.


राय यांनी सांगितले, की २०११ मध्ये केंद्रीय ग्रामविकास मंत्रालय व तत्कालीन गृहनिर्माण आणि नागरी गरिबी निर्मूलन मंत्रालयाने सामाजिक-आर्थिक आणि जातीनिहाय जनगणना केली होती. ती जनगणना देशातील शहरी व ग्रामीण भागात करण्यात आली होती. 



त्यावेळी गोळा करण्यात आलेली जातीनिहाय माहिती जाहीर करणार नसल्याचे यावर्षी मार्चमध्येही सरकारने संसदेमध्ये कळविले होते. या माहितीचे वर्गीकरण करण्यासाठी सामाजिक न्याय व विकास मंत्रालयाला कच्ची माहिती पुरविण्यात आली आहे. मात्र, ती माहिती सार्वजिनक करण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या नाही.

या राज्यांनी केली होती विनंती

महाराष्ट्र आणि ओडिशा सरकारने जनगणनेमध्ये जातींचीही माहिती गोळा करण्याची विनंती केली होती. परंतु, केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना न करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र आणि ओडिशा सरकारने जनगणनेमध्ये जातींचीही माहिती गोळा करण्याची विनंती केली होती. परंतु, केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना न करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.


जनगणना २०२१ मध्ये होणे अपेक्षित होते. त्याबाबत मार्च २०१९ मध्ये गॅझेट नोटिफिकेशनही काढण्यात आले होते. परंतु, कोरोनामुळे जनगणनेचे काम पुढे ढकलण्यात आल्याचे नित्यानंद राय यांनी सांगितले.


आमच्या सरकारचा चेहरा ओबीसी आहे, अशी ढोंगी विधाने करणार्‍या केंद्राने ओबीसींच्या तोंडाला पाने पुसली आहेत. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्त्वातील समितीने ओबीसी जनगणनेचा आग्रह धरला होता. सुमित्रा महाजनांच्या अध्यक्षतेखालील १६ खासदारांच्या समितीने तीच भूमिका घेतली होती. 


संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांनीही तीन वर्षांपूर्वी पुढील जनगणनेत ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेचे असे आश्‍वासन दिलेले होते. ओबीसींची जनगणनाच केली नाही तर त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधी न दिल्याने वर्षानुवर्षे होत असलेला अन्याय यापुढेही कायम राहील अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.  



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
‘पेगासस’वरून केंद्रावर हल्लाबोल करणारी कॉंग्रेस ईव्ही
कोरोना काळात विमा असूनही पडतोय खिशावर ताण; शब्दांच्या खे
फोन टॅपिंग प्रकरण: पोलिस महासंचालक, कुंटे यांच्या परवानग
उत्तर प्रदेशात ‘गुंड’विकास दुबेचा उभारणार पुतळा
महापुराच्या संकटाला रोखण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरा
‘पेगासस’च्या स्वतंत्र चौकशीसाठी ज्येष्ठ पत्रकारांची स
२०१९ मध्ये एससी-एसटींवरील अत्याचारात ११.४६ टक्क्यांनी व
केंद्र सरकारच्या हातात देश सुरक्षित नाही
पुरंदरेनी इतिहासाला कधीही धक्का लावला नाही
आणखी सहा महिन्यांनी सीएए लागू करणार?
देशातील बँका आणि इन्शुरन्स कंपन्यांकडे ५० हजार कोटी रुप
देशात हेतुपुरस्सर कर्जबुडवे वाढले
गरीब-श्रीमंत देशांतील दरी आणखी रुंद होणार
शाळा बंद: जगभरातील १६० कोटी तर भारतातील २५ कोटी मुलांच्य
परमबीर सिंग यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस
नीटद्वारे केंद्रीय कोट्यात २७ टक्के आरक्षण मेडीकलसाठी
जनता गरीबीत आणि महागाईत होरपळतेय, मंत्र्यांच्या संपत्त
२०२० च्या पूरबाधितांना केंद्राकडून फुटकी कवडी
नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये चोरी नाही, तर नजरचूक!
विजय मल्ल्याला लंडन कोर्टाने ठरवले दिवाळखोर
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper