×

सीएए: मुस्लिमांवर परिणाम होणार नसला तरी एससी, एसटी, ओबीसीवर होईल त्याचे काय?

Published On :    21 Jul 2021  By : MN Staff
शेयर करा:


मोहन भागवत यांच्याकडे उत्तर आहे का? लोकांचा सवाल





गुवाहाटी:  सीएएमुळे देशातील मुस्लिमांवर परिणाम होणार नाही असे आरएसएसप्रमुख मोहन भागवत यांनी सांगितले आहे. परंतु सीएएचा परिणाम एससी,एसटी, ओबीसीवर होणार आहे त्याचे काय? यावर भागवत यांच्याकडे उत्तर आहे का? असा सवाल लोकांनी केला आहे.


नानी गोपाळ महंता लिखीत आसाम आणि इतिहासाचे राजकारण या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते गुवाहाटी येथे बोलत होते. त्यांनी नागरिकत्व सुधार अधिनियमावर (सीएए) भाष्य केले. भारत अनेक वर्षापासून अल्पसंख्यांकांची काळजी घेत आहे, तर पाकिस्तान असे करण्यात अपयशी ठरल्याचे सांगत पुन्हा एकदा पाकिस्ताविरोधाचा सूर आळवला. भांडण न करता एकमेकांशी सुसंवाद साधणे गरजेचे आहे. 


राजकीय लाभासाठी दोन्ही विषयांना (सीएए-एनआरसी) हिंदू मुस्लिमचा विषय बनविण्यात आला आहे, हा हिंदू मुस्लिमांचा विषय नाही असे त्यांनी खोटेच सांगितले. हे फक्त आपल्या बाबतीत घडले आहे, कारण उर्वरित जगाचे हे मत आहे. जर आपल्याला समरसतेने जगायचे असेल तर या सर्व गोष्टी एकसारख्याच असाव्यात असे सांगत समरतेच्या बेटकुळ्या फुगवल्या. भागवत यांनी आसाम आणि अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि त्रिपुरा अशा इतर ईशान्येकडील राज्यांमधील आरएसएसच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांशी बैठक घेतली.


समताऐवजी समरसता का?

भारतातील बहुजन महापुरूषांनी समतेचा नारा दिला आहे. परंतु ब्राम्हणांनी समरसतेचा ढोल बडवला आहे. खासकरून आरएसएसच्या माध्यमातून. समरसता म्हणजे ब्राम्हणवादाने ज्या थोतांडी कल्पना निर्माण केल्या आहेत, त्या कल्पनांचा स्वीकार करणे होय. 


म्हणजे ब्राम्हणी गुलामी थोपवून घेणे होय. त्यासाठी ते चलाखीपणे समताऐवजी समरसता असा शब्दप्रयोग करून लोकांना मूर्ख बनवण्याचे काम करत आहेत. ब्राम्हणी व्यवस्थेशी समरस होऊन त्यांच्या हिताचे काम करणे असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे भागवत यांनी पुन्हा एकदा गुवाहाटी दौर्‍यात समरतेचा ढोल बडवला.

डीएनए बेसड् एनआरसी करावी

आसाम सरकारने एनआरसीच्या जाहीर केलेल्या यादीत १९ लाख ४८ हजार लोकांपैकी ५ लाख मुस्लीम सोडले तर त्यातील १४ लाख ४८ हजार हे एससी, एसटी, ओबीसी आहेत. म्हणजे एससी,एसटी, ओबीसीला एनआरसीच्या यादीतून बाहेर फेकण्यात आले आहे. त्यामुळे एससी, एसटी, ओबीसीचे जास्त नुकसान होणार असून त्यांच्या मानेवर घुसखोर असल्याची टांगती तलवार आहे. 


खरं म्हणजे ज्यांनी एनआरसी, सीएएची थेरं आणली आहेत ते ब्राम्हणच भारतात घुसखोर आहेत. परिणामी डीएनए बेसड् एनआरसी करावी अशी मागणी बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाने केली आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
‘पेगासस’वरून केंद्रावर हल्लाबोल करणारी कॉंग्रेस ईव्ही
कोरोना काळात विमा असूनही पडतोय खिशावर ताण; शब्दांच्या खे
फोन टॅपिंग प्रकरण: पोलिस महासंचालक, कुंटे यांच्या परवानग
उत्तर प्रदेशात ‘गुंड’विकास दुबेचा उभारणार पुतळा
महापुराच्या संकटाला रोखण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरा
‘पेगासस’च्या स्वतंत्र चौकशीसाठी ज्येष्ठ पत्रकारांची स
२०१९ मध्ये एससी-एसटींवरील अत्याचारात ११.४६ टक्क्यांनी व
केंद्र सरकारच्या हातात देश सुरक्षित नाही
पुरंदरेनी इतिहासाला कधीही धक्का लावला नाही
पेगासस बनवणार्‍या कंपनीवर इस्त्रायल सरकारची छापेमारी
आणखी सहा महिन्यांनी सीएए लागू करणार?
देशातील बँका आणि इन्शुरन्स कंपन्यांकडे ५० हजार कोटी रुप
देशात हेतुपुरस्सर कर्जबुडवे वाढले
गरीब-श्रीमंत देशांतील दरी आणखी रुंद होणार
शाळा बंद: जगभरातील १६० कोटी तर भारतातील २५ कोटी मुलांच्य
परमबीर सिंग यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस
नीटद्वारे केंद्रीय कोट्यात २७ टक्के आरक्षण मेडीकलसाठी
जनता गरीबीत आणि महागाईत होरपळतेय, मंत्र्यांच्या संपत्त
२०२० च्या पूरबाधितांना केंद्राकडून फुटकी कवडी
नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये चोरी नाही, तर नजरचूक!
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper