×

सुरजागड प्रकल्प: आदिवासींना हक्क आणि अधिकारापासून वंचित करण्याचा डाव

Published On :    21 Jul 2021  By : MN Staff
शेयर करा:


जिल्ह्यातील ग्रामसभांचे राज्यपालांना निवेदन, आदिवासी बहुल भागातील खाणींवर डोळा





 गडचिरोली:  एटापल्ली तालुक्यातील सुरजागड प्रकल्पात बेकायदेशीरपणे लोह खाणी खोदल्या जात आहेत. संविधानाच्या तरतुदीनुसार पेसा व वनहक्क कायद्यान्वये जल, जंगल, जमीन आणि संसाधनांच्या मालकी हक्कांना डावलून आदिवासींना हक्क व अधिकारापासून वंचित करण्याचा डाव शासक वर्गाने आखला आहे. त्यामुळे या परिसरातील लोह खाणी तात्काळ रद्द कराव्यात, अशी मागणी जिल्ह्यातील ग्रामसभांनी राज्यपालांकडे निवेदनाद्वारे केली आहे.


पंचायत उपबंध अनुसूचित क्षेत्रावर विस्तार अधिनियम १९९६ अन्वये आपल्या धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक प्रथा, परंपरा आणि न्याय निवाडा व जल-जंगल-जमीन आणि साधन संपत्तीचे रक्षण व जतन आणि व्यवस्थापन व नियोजन करण्यास तसेच विकास योजना आणि स्वशासन व्यवस्था चालविण्यास सक्षम आहोत. 


तसेच अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी वन हक्क मान्यता कायद्याच्या तरतुदींचीही ग्रामसभांद्वारे अंमलबजावणी सुरु आहे. अशा स्थितीमध्ये एटटापल्ली तालुक्यातील सुरजागड परिसरातील बांडे, सुरजागड, दमकोंडवाही, गुंडजूर-मोहन्दी व कोरची तालुक्यातील आगरी, मसेली, झेंडेंपार तसेच इतर ठिकाणच्या संपूर्ण पंचेवीस लोह खनिजाच्या खदानींस मंजूरी देवून व प्रस्तावित करुन बळजबरी सुरु आहे.


ग्रामसभांच्या देवांच्या पवित्र जंगलांमधून बांबू, तेंदू व इतर गौण वनउपजांच्या व्यवस्थापनातून तेथील ग्रामसभांना मोठ्या प्रमाणावर शाश्‍वत रोजगार निर्माण झालेला आहे. तसेच तेथील देवांच्या पवित्र जंगलांतून उपजिविका व उदरनिर्वाह पारंपारिक रित्या ग्रामसभा करीत आहेत. त्यामुळे शासनाने स्थानिकांना रोजगार निर्मितीच्या नावावर तेथील जंगल व पहाडांमध्ये खाणी खोदून, तेथील पारंपारीक साधनसंपत्ती व जैविक विविधता नष्ट करु नये. सोबतच धार्मिक व पारंपरिक पुजास्थाने असतांना, शासन व कंपन्यांकडून कोणतीही खातरजमा न करता या ठिकाणी लोह उत्खननाची व पुर्वेक्षणाची मंजूरी दिली गेल्याने तेथील देव व देवांचे पवित्र डोंगर-पहाड व जंगल शासनाने खदानी करीता विकले.


भारतीय संविधानाच्या कोणत्याही कलमात आदिवासींचे देव व देवांच्या पवित्र जागा विकणे किंवा त्या ठिकाणी खदानी खोदण्याची तरतुद नसतांनाही शासनाच्या विविध विभागांनी में.लॉयड्स मेटल्स् न्ड इंजिनिअर्स लिमी. मुंबई या कंपनीला विकलेले आहेत. ही बाब संविधानविरोधी आहे. मागण्यांचे निवेदन  स्थानिक ग्रामसभा आणि सुरजागड पारंपरिक इलाखा गोटुल समीतीच्या वतीने राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्र्यांना अनेकदा सादर करण्यात आले आहे. 


आताचे निवेदन सादर करतांना जि.प. सदस्य सैनू गोटा, भाई जराते, अमोल मारकवार, जि.प.सदस्य अनिल केरामी, उपसभापती सुखराम मडावी, पं.स.सदस्य शिला गोटा, जयश्री वेळदा, मनोहर बोरकर, सरपंच अरुणा सडमेक, उपसरपंच राकेश कवडो, माजी सरपंच कल्पना आलाम, जवेलीचे सरपंच मुन्ना पुंगाटी, कोठीच्या सरपंच भाग्यश्री लेखामी, धोडराजच्या सरपंच सोनाली पोटामी, रायसिंग हलामी, प्रेमदास गोटा, जनिराम होळी, भकाराम मरसकोल्हे, मंगेश नरोटे, चिन्नू महाका, लक्ष्मण नवडी, दोहे हेडो, चुकलू दोरपेटी, दारसू तिम्मा, धर्मा तिम्मा, बिरजू गोटा, पत्तू पोटामी, विनू मट्टामी यांच्यासह ग्रामसभांचे शेकडो प्रतिनिधी उपस्थित होते.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
‘पेगासस’वरून केंद्रावर हल्लाबोल करणारी कॉंग्रेस ईव्ही
कोरोना काळात विमा असूनही पडतोय खिशावर ताण; शब्दांच्या खे
फोन टॅपिंग प्रकरण: पोलिस महासंचालक, कुंटे यांच्या परवानग
उत्तर प्रदेशात ‘गुंड’विकास दुबेचा उभारणार पुतळा
महापुराच्या संकटाला रोखण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरा
‘पेगासस’च्या स्वतंत्र चौकशीसाठी ज्येष्ठ पत्रकारांची स
२०१९ मध्ये एससी-एसटींवरील अत्याचारात ११.४६ टक्क्यांनी व
केंद्र सरकारच्या हातात देश सुरक्षित नाही
आणखी सहा महिन्यांनी सीएए लागू करणार?
देशातील बँका आणि इन्शुरन्स कंपन्यांकडे ५० हजार कोटी रुप
देशात हेतुपुरस्सर कर्जबुडवे वाढले
गरीब-श्रीमंत देशांतील दरी आणखी रुंद होणार
शाळा बंद: जगभरातील १६० कोटी तर भारतातील २५ कोटी मुलांच्य
परमबीर सिंग यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस
नीटद्वारे केंद्रीय कोट्यात २७ टक्के आरक्षण मेडीकलसाठी
जनता गरीबीत आणि महागाईत होरपळतेय, मंत्र्यांच्या संपत्त
२०२० च्या पूरबाधितांना केंद्राकडून फुटकी कवडी
नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये चोरी नाही, तर नजरचूक!
विजय मल्ल्याला लंडन कोर्टाने ठरवले दिवाळखोर
केंद्राच्या कोळसा कंपनीकडून जादा दरआकारणीचा राज्यातील
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper