×

जागतिक रँकिंगमध्ये पहिल्या ३०० मध्ये भारतातील एकही विद्यापीठ नाही

Published On :    3 Sep 2021  By : MN Staff
शेयर करा:


आयआयएस देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ, शासक वर्गाने शिक्षणाचा स्तर घसरवून टाकला





लंडन: एकेकाळी भारत हा जागतिक ज्ञानाचा केंद्रबिंदू होता. जगातील लोक भारतात शिकायला यायचे. मात्र आता त्याच भारताच्या शिक्षणाचा स्तर एवढा घसरवून टाकण्यात आला आहे की, जागतिक रॅकींगमध्ये पहिल्या ३०० मध्ये भारतातील एकही विद्यापीठ नाही. भारताचा शासक वर्ग विदेशी अल्पसंख्य ब्राम्हण असल्याने त्याने शिक्षणाचा स्तर घसरवून टाकला आहे. त्यामुळे आज अशी परिस्थिती ओढवली असल्याचे बोलले जात आहे.


टाइम्स हायर एज्युकेशनने गुरुवारी जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांचे रँकिंग जारी केले. जागतिक विद्यापीठ रँकिंग-२०२२ मध्ये ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठ सलग सहाव्या वर्षी अव्वल क्रमांकावर आहे. यादीत भारतातील ७१ विद्यापीठांनी स्थान मिळवले आहे. 


इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएस), बंगळुरू भारतातील सर्वोच्च रँकिंगची संस्था ठरली आहे. सलग तिसर्‍या वर्षी या संस्थेचे रँकिंग ३०१ ते ३५० दरम्यान कायम आहे. या वेळी यादीत ९९ देशांतील १ हजार ६६२ विद्यापीठांचा समावेश आहे. गेल्या वर्षी १ हजार ५२७ विद्यापीठे होती. यंदा यादीत भारताच्या ७१ संस्थांचा समावेश आहे. आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या आहे. गेल्या वर्षी ही संख्या ६३ होती. तथापि, कुठलीही संस्था अव्वल ३०० मध्येही स्थान मिळवू शकली नाही. त्यामुळे शिक्षण किती खालच्या स्तरावर घसरले आहे हे लक्षात येते.


 दिल्ली, मुंबई, खरगपूर आणि मद्राससहित सात फर्स्ट जनरेशनच्या भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) या यादीबाहेर आहेत. डेटा विसंगती आणि पारदर्शकतेच्या अभावाचा हवाला देत या संस्थांनी गेल्या वर्षी जागतिक रँकिंगमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. टाइम्स हायर एज्युकेशनचे प्रमुख नॉलेज अधिकारी फिल बॅटी यांनी सांगितले की, आम्ही रँकिंगमध्ये सहभागी न होणार्‍या सर्व आयआयटीशी संपर्क केला आहे.

जगातील टॉप १० विद्यापीठे  

१. ऑक्सफर्ड विद्यापीठ, २. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ३. हार्वर्ड विद्यापीठ, ४. स्टॅनफर्ड विद्यापीठ, ५. केम्ब्रिज विद्यापीठ, ६. एमआयटी, ७. प्रिन्स्टन विद्यापीठ, ८. कॅलिफोर्निया बर्कले विद्यापीठ, ९. येल विद्यापीठ, १०. शिकागो विद्यापीठ.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सामाजिक बांधीलकीतून समजते समाजातील व्यक्तीमत्व
विकासासाठी हवे सर्वसमावेशक कोकण पर्यटन !
आरएसएसची तालिबानशी तुलना
क्रांती म्हणजे अन्यायावर आधारलेल्या प्रचलित समाज व्यवस
शहीद भगतसिंग यांचे शिक्षण चिंतन
मुंबई महापालिका प्रमाणेच संपूर्ण १८ महापालिकांमध्ये १
एअर इंडिया खरेदीसाठी रतन टाटांची बोली
राज्यभरातील २४६ दुकानांना औषध विक्री बंद करण्याचे आदेश
अर्थसंकल्पात ओबीसींसाठी केवळ १८ रुपये
‘बार्टी’ची स्थिती कधी सुधारणार?बजेटमध्ये ३०० कोटी प्रत
१७५० ला पेशवाई आली असे अगोदर म्हणालात आता नाही म्हणता?
कोरेगाव-भीमा दंगलीत हिंदुत्ववादी संघटनेचा हात असल्याचे
जातीनिहाय जनगनणेबाबत केंद्र सरकारवर दबाव टाकायला हवा
आरक्षण, जातीनिहाय जनगणनेसाठी ओबीसी संघटनांसह राज्यसरका
जेवणाची भांडी वेगळी ठेवत शाळेत अनु.जातीच्या मुलांसोबत भ
ओबीसींचा संभाव्य उद्रेक रोखण्यासाठी इम्पिरिकल डेटा रोख
अमेरिकन माध्यमांमध्ये नरेंद्र मोदींची भेट बेदखल
इंटरनेटवरील निर्बंध, नवीन आयटी नियमांवर फ्रीडम हाऊसचे भ
भारतीय विद्यार्थी मोर्चाचा ‘आक्रोश मोर्चा’
भारतात विज्ञान नष्ट, श्रद्धा (अज्ञान) सर्वश्रेष्ठ
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper