×

गव्हाच्या किंमतीत ४० रूपयांची वाढ: डिझेल २५ रूपयांनी महागलेय

Published On :    9 Sep 2021  By : MN Staff
शेयर करा:


शेतकर्‍यांच्या हातात काय? सरकारने आवळा देऊन कोहळा काढला, एमएसपीच्या नावाखाली फसवणूक





नवी दिल्ली:  केंद्र सरकारने रब्बी हंगाम २०२२-२३ साठी गहू, मोहरी, जव, मसूर, हरभरा आणि सूर्यफूल या सहा पिकांसाठी किमान आधारभूत किंमती (एमएसपी) जाहीर केल्या आहेत. गव्हाच्या किंमतीत ४० रुपयांनी वाढ झाली आहे.  वाढलेले दर स्वामीनाथन आयोगाप्रमाणे किंमतीच्या दीडपट आहेत, असे केंद्र सरकार सांगत असले तरी डिझेल २५ रुपयांनी महाग झाले आहे. मग शेतकर्‍याकडे काय शिल्लक राहणार? असा सवाल करतानाच सरकारने आवळा देऊन कोहळा काढला अशा प्रतिक्रिया शेतकर्‍यांनी व्यक्त केल्या आहेत.


८ सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समितीने  रब्बी हंगाम २०२२-२३ साठी पिकांच्या दरात वाढ करण्यास मंजुरी दिली. आता गव्हाचा दर १९७५ वरून २०१५ रुपये प्रति क्ंिवंटल, जव १६०० रुपयांवरून १६३५ रुपये आणि हरभरा ५१०० वरून ५२३० रुपये, मसूरचा एमएसपी ५१०० वरून ५५०० रुपये, मोहरीचा दर ४६५० रुपयांवरून ५०५० रुपये आणि सूर्यफूल ५३२७ वरून ५४४१ पर्यंत वाढ झाली.


केंद्र सरकारने म्हटले आहे की, विपणन हंगाम २०२२-२३ साठी रब्बी पिकांसाठी एमएसपीमध्ये वाढ केंद्रीय अर्थसंकल्प २०१८-१९ मध्ये जाहीर केलेल्या उत्पादन खर्चाच्या किमान १.५ पट पातळीवर आहे. शेतकरी शेतीत खर्च केलेल्या रकमेच्या आधारे जास्तीत जास्त नफ्याचा अंदाज लावला गेला आहे. या संदर्भात, गहू, मोहरी  फायदेशीर असणे अपेक्षित आहे. याशिवाय डाळी, हरभरा, जव, केशर उत्पादनात नफा अपेक्षित आहे.


दरम्यान केंद्र सरकारने वाढवलेला एमएसपी अपुरा असल्याचे शेतकर्‍यांनी म्हटले आहे. किसान नावाच्या ट्विटर हँडलने गव्हाचा एमएसपी आणि डिझेलच्या किंमतींची तुलना केली आहे. गव्हाच्या किमती ४० रुपयांनी वाढल्या आहेत, डिझेल २५ रुपयांनी आणि खताच्या बियाण्याच्या किमतीत गेल्या एक वर्षात दीडपट वाढ झाली आहे. महागाई गगनाला भिडलेली आहे. सरकारने ४० रुपये वाढवून शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे. एमएसपी वाढीवर शेतकरी संघटनांनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 


भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी याला फसवणूक म्हटले आहे. टिकैत म्हणाले की, हंगाम २०२२-२३ च्या खरेदीसाठी जाहीर करण्यात आलेली किमान आधारभूत किंमत ही शेतकर्‍यांसोबत सर्वात मोठा विनोद आहे. गेल्या वर्षी गव्हाच्या उत्पादनाचा खर्च कृषी मूल्य आयोगाने १४५९ रुपये नोंदवला होता आणि या वर्षी हा खर्च १००८ रुपये केला आहे. यापेक्षा मोठा विनोद काहीही असू शकत नाही. 


जर आपण महागाई दराबद्दल बोललो तर या वर्षी महागाई ६ टक्क्यांनी वाढली आहे. मागच्या वर्षी ज्याप्रकारे आधारभूत किंमत वाढवण्यात आली होती, जर ते सूत्र देखील अंमलात आणले गेले, तर शेतकर्‍यांना ७१ रुपयांनी कमी दिले गेले आहेत, ज्याला सरकार एमएसपी मोठे पाऊल म्हणत आहे, त्याने शेतकर्‍यांचे खिसे कापण्याचे काम केले आहे. इतर काही पिकांमध्ये थोडी वाढ झाली आहे, पण त्या पिकांची खरेदी न केल्यामुळे शेतकर्‍यांचा माल बाजारात स्वस्त दरात लुटला जातो.


टिकैत म्हणाले की, सरकारने शेतकर्‍यांना पंतनगर विद्यापीठ आणि लुधियाना विद्यापीठ आणि इतर गहू उत्पादक संशोधन केंद्रांची किंमत काय आहे हे देखील सांगावे. सरकारकडून शेतकर्‍यांवर नेहमीच अन्याय होत आहे. १९६७ मध्ये २.५ क्ंिवटल गहू विकून एक तोळा सोने विकत घेता येत होते, आज जर एखाद्या शेतकर्‍याला एक तोळा सोने विकत घ्यावे लागते, तर २५ क्ंिवटल गहू विकावा लागेल. हा खरा अन्याय आहे. कोणत्याही सरकारने शेतकर्‍यांना आर्थिक न्याय दिला नाही अशी टिकैत यांनी टीका केली आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सामाजिक बांधीलकीतून समजते समाजातील व्यक्तीमत्व
विकासासाठी हवे सर्वसमावेशक कोकण पर्यटन !
आरएसएसची तालिबानशी तुलना
क्रांती म्हणजे अन्यायावर आधारलेल्या प्रचलित समाज व्यवस
शहीद भगतसिंग यांचे शिक्षण चिंतन
मुंबई महापालिका प्रमाणेच संपूर्ण १८ महापालिकांमध्ये १
एअर इंडिया खरेदीसाठी रतन टाटांची बोली
राज्यभरातील २४६ दुकानांना औषध विक्री बंद करण्याचे आदेश
अर्थसंकल्पात ओबीसींसाठी केवळ १८ रुपये
‘बार्टी’ची स्थिती कधी सुधारणार?बजेटमध्ये ३०० कोटी प्रत
१७५० ला पेशवाई आली असे अगोदर म्हणालात आता नाही म्हणता?
कोरेगाव-भीमा दंगलीत हिंदुत्ववादी संघटनेचा हात असल्याचे
जातीनिहाय जनगनणेबाबत केंद्र सरकारवर दबाव टाकायला हवा
आरक्षण, जातीनिहाय जनगणनेसाठी ओबीसी संघटनांसह राज्यसरका
जेवणाची भांडी वेगळी ठेवत शाळेत अनु.जातीच्या मुलांसोबत भ
ओबीसींचा संभाव्य उद्रेक रोखण्यासाठी इम्पिरिकल डेटा रोख
अमेरिकन माध्यमांमध्ये नरेंद्र मोदींची भेट बेदखल
इंटरनेटवरील निर्बंध, नवीन आयटी नियमांवर फ्रीडम हाऊसचे भ
भारतीय विद्यार्थी मोर्चाचा ‘आक्रोश मोर्चा’
भारतात विज्ञान नष्ट, श्रद्धा (अज्ञान) सर्वश्रेष्ठ
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper