×

बहुजननायक मान्यवर कांशीरामजी - एक अध्याय

Published On :    9 Oct 2021  By : MN Staff
शेयर करा:


कांशी तेरी नेक कमाई..! तुने सोती कौम जगाई..!!





कांशी तेरी नेक कमाई..!
तुने सोती कौम जगाई..!!
खरंच..!, झोपलेल्या समाजाला जागं करून समाजातील विविध जाती, पोट- जातींची मोट बांधून सामाजिक संघटनेच्या माध्यमातून राजकीय सत्ता हस्तगत करण्याचे सूत्र बहुजनवादी चळवळीला ज्यांनी दिले आणि देशातील राज्यशास्त्राचा समदा भूगोलचं बदलवून टाकला असे आंबेडकरी राजकारणाला नवं संजीवनी देणारे बामसेफ, डी एस फोर तथा बहुजन समाज पक्षाचे संस्थापक मान्यवर कांशीरामजी..! यांचा आज निर्वाणदिन..! यादिनानिमित्त बहुजन समाजात आजवर त्यांनी केलेल्या अविस्मरणीय सामाजिक आणि राजकीय क्रांतीचे स्मरण करणे महत्त्वाचे ठरते.


पंजाबच्या रूपनगर येथे १५ मार्च १९३४ साली रैदासी सिख परिवारात जन्माला आलेले कांशीराम यांनी भारतीय राजकारणाचे सरसकट व्याकरणच बदलून टाकले. पुण्यातील डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलमेंट ऑर्गनायझेशन येथे नोकरीवर असताना विश्‍वरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची सार्वजनिक सुट्टी रद्द केल्याने सामाजिक संघर्षाचा वणवा पेटला आणि या वणव्यातून कांशीराम नावाचा निखारा अस्मितेच्या हक्कासाठी लखलखला तो आजतागत अजरामर..! त्यांनी सर्व जातींचा, जाती व्यवस्थेचा सखोल अभ्यास केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे वाचन केले. 


एनीहिलेशन ऑफ कास्ट वाचून त्यातून प्रभावित होऊन १९७१ साली सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन सामाजिक, राजकीय संघर्षमय वाटचालीस कांशीराम घराबाहेर पडले. त्यांनी आपल्या काही सहकारी मित्रांना सोबतीला घेऊन समाजातील शोषित पीडित  कर्मचारी वर्गाला न्याय मिळावा या मुख्य हेतूने अनुसूचित जाती - जनजाती, इतर मागास वर्ग आणि अल्पसंख्याक कर्मचारी कल्याण संस्थेची पुणे येथे स्थापना केली. या संस्थेशी कर्मचारी वर्ग उत्तरोत्तर जुळत गेल्याने कांशीराम यांनी १९७३ ला (बॅकवर्ड अँड मायनॉरिटी कम्युनिटीज एम्प्लॉय फेडरेशन) बामसेफ या संघटनेची स्थापना केली. या संघटनेचे मुख्य आदर्श वाक्य एज्युकेट, ऑर्गनाइज अँड एजिटेट..! ठेऊन त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूलभूत विचार, त्यांचा सामाजिक संघर्ष, मौलिक संदेश लोकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य या संघटनेच्या माध्यमातून केले. 



डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक समता जनसामान्यांमध्ये रुजावी या हेतूने १९८० मध्ये त्यांनी आंबेडकर मेला या अभियानाअंतर्गत सायकल यात्रा काढून संपूर्ण भारत पिंजून काढला. खर्‍या अर्थाने  सामाजिक सशक्तीकरणाचा पाया इथूनच मजबुत होत गेला.  कांशीराम यांनी बामसेफला समांतर अशी डी एस फोर (दलित शोषित समाज संघर्ष समिती) ची १९८४ मध्ये स्थापना केली. समाजात जातीप्रथेविरुद्ध जनजागृती करणार्‍या लोकांवर विषमतावादी लोकांकडून हल्ले होत असतांना अशा सामाजिक कार्यकर्त्यांच्या बचावासाठी, त्यांचा सामाजिक संघर्षाला जागे ठेवण्याच्या उद्देशाने डी एस फोर ची स्थापना करण्यात आली होती.  विखुरलेल्या बहुजन घटकांचे एकीकरण आणि उत्थानाकरिता सुरू झालेला त्यांचा हा परिवर्तनवादी लढा १९८४ साली बहुजन समाज पार्टी या राजकीय  पक्षाच्या स्वरूपात देशात नावारूपास आला.


बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले..! असे म्हणतात ते उगाच नाही. जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहा की, तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात व्हायचं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संदेश त्यांनी प्रत्यक्षात गुंडे - पंड्यांची भूमी उत्तरप्रदेश सारख्या विशाल राज्यात बहुजन समाज पक्षाचे सरकार आणून साकार करून दाखविले. कांशीराम हे स्वतः १९९१ साली इटावा आणि १९९६ साली होशियारपुर या लोकसभा क्षेत्रातून दोनदा निवडून आलेत. इतके बहुजनवादी साम्राज्य प्रस्थापित करून देखील मान्यवर कांशीराम यांना टीचभर देखील नेतागिरीची गुर्मी नव्हती. कांशीराम स्वतः म्हणायचे, मैं कोई लीडर नही हुं, मैं आपके जैसा ही एक सामान्य कार्यकर्ता हुं ! बस आप लोगो से थोडा बहुत काम अच्छा कर लेता हुं, तो देश के लोग मुझे नेता मानते हैं !! राजकारणात कांशीराम यांनी सामान्य कार्यकर्त्याला मोलाचे स्थान दिले होते. ते कार्यकर्त्याला अल्लाउद्दिनचा चिराग संबोधायचे. त्यांनी परिवर्तनाच्या जिद्दीने  आणि तत्वाशी तडजोड न करता होऊ शकत नाही..! च्या विरोधात होऊ शकत आहे..! ही भावना जनसामान्य लोकांमध्ये जागृत केली आणि ओसाडलेल्या रानात कांशीराम यांनी राजकीय सत्ता अधिकाराची नवंसंजीवनी फुलविली.


हे पण वाचा: मान्यवर कांशीरामजी यांनी बहुजन समाजाला बनविले शासनकर्ती जमात



 मान्यवर कांशीराम यांनी स्थापन केलेला बसपा हा बाह्यस्वरुपात एक राजकीय पक्ष जरी असला तरी खर्‍या अर्थाने बहुजनवादी समीकरणातून तयार झालेली आणि राजकीय हक्क प्रस्थापित करण्यासाठी उभारलेली एक विस्तृत सामाजिक चळवळ आहे. ज्याचा पायंडा हा सर्वसामान्य कार्यकर्ता होता. पक्षनिष्ठा, त्याग, समर्पण आणि  एकजुटीने राहण्याचे मूल्य कर्मचारी वर्गात, बहुजन समाजात रुजवून एक कॅडर बेस कार्यकर्ता तयार करण्याचे कौशल्य हे मान्यवर कांशीराम यांनी बहुजन चळवळीत आणून आंबेडकरी राजकारणाला एक नवा आयाम दिला होता. राजकारण म्हटलं की, आरोप - प्रत्यारोप, यश - अपयश, महत्वाकांक्षा, नेतृत्व लालसा, भ्रष्टाचार, हेवेदावे हे आलेच. 



मात्र त्यापलीकडे जाऊन ज्यांना बांधिलकीची परिभाषा कळली आहे, ज्यांना चळवळीशी एकनिष्ठा अवगत आहे असे लोक आजही बसपा आणि मान्यवर कांशीराम यांच्या विचारधारेशी जुळलेले आहेत. आंबेडकरी राजकारणातील एक वाईट शोकांकिका अशी की, इतर आंबेडकरी पक्षातील नेत्याला वाईट बोलून माझा नेता किती श्रेष्ठ..? अशी मांडणी करून पक्ष, चळवळ वाढविण्याचा ससेहोलपटपणा करतात. मात्र इतरांना वाईट न बोलता आपली विचारधारा कशी लोकांपुढे मांडता येईल..? हे कौशल्य अजुनही आत्मसात नाही. कदाचित याच कारणामुळे कांशीराम यांची चळवळ जनसामान्य लोकांपर्यंत पोहचली नाही. किंवा कोणी स्वीकारायला तयार नाही. वा हेतुपरस्पर, स्वार्थ भावनेमुळे समजून घ्यायला तयार नाहीत. बहुजनवादी राजकारणातील चाणक्य म्हणजे मान्यवर कांशीराम..! तेव्हा इतर नेत्यांना वाईट संबोधून कांशीराम लोकांपुढे मांडता येणार नाही.
मैं अकेला ही चला,
जानिबे मंजिल की ओर !
लोग जुडते गये,
और कारवां बनता गया !!


राजकारणात माणसं जोडायची असतात, तोडायची नाही. कुणाची निंदा करून चळवळ वाढविता येत नाही. जोपर्यंत समाजात आपण रिझल्ट ओरिएंटेड काम करतं नाही तो पर्यंत समाज आपल्याला, आपल्या कामाला स्विकारत नाही. समाजातील तळागाळातील समस्या सोडविण्यात आपण पुढाकार घेतला की इतरांवर टीका टीप्पणी न करता आपला पक्ष, आपली विचारधारा लोकांपर्यत सहज पोहचविता येते. मात्र निंदा, टीका - टीप्पणी करून माणसं जोडता येणार नाहीत. 


कर्तबगारीला वैचारिकतेची जोड मिळाली की, परिवर्तन घडविता येते. आणि हेच मान्यवर कांशीराम यांच्या कार्यशैलीतून दिसून येते. समाजातील लेखक, वक्ते यांनी आजवर समाजातील इतर नेत्यांवर टीका करूनच आपले लिखाण, वकृत्व समाजावर थोपविले. त्यामुळे कोणी इर्षेपोटी कांशीराम स्विकारला नाही किंवा समजून घेतला नाही. हे देखील वास्तव आपल्याला मान्य करावेच लागेल. मान्यवर कांशीराम एक अध्याय आहे. ते समजणे आणि समजून घेणे हे कॅडर कॅम्पचा माध्यमातून शक्य आहे. सशक्तीकरणासाठी आणि चळवळीला समर्पित कांशीरामजींना अपेक्षित असा अल्लाउद्दिनचा चिरागरुपी कार्यकर्ता हा कॅडर कॅम्पमधूनच तयार होणार आणि असा कार्यकर्ताच कांशीरामजींची चळवळ अबाधित ठेऊ शकणार. तेव्हा कॅडर कॅम्पमधून कांशीराम मांडून त्यांचे विचार, त्यांचे कार्य समाजात पोहचवून बहुजन विचारधारा मजबूत करणे हीच आजच्या दिनी त्यांना खरे अभिवादन असेल.

अखिल खैरे
७७६९८७४४००



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
गुन्हेगारीमध्ये तामिळनाडू नंबर १, महाराष्ट्र पाचवे; उत्
शेतकरी आंदोलकांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर भाजप प
ओबीसींच्या जातनिहाय जगणनेसाठी १० डिसेंबरला भारत बंद कर
विमानाच्या इंधनापेक्षाही बाईक, गाड्यांचे इंधन महाग
१३ लाखांहून अधिक नमुन्यांपैकी १.११ लाखांहून अधिक दूषित
व्यथा आगरी कोळी मच्छिमारांच्या...
४१ टक्के नागरिकांना पाठीच्या मणक्याचा जडला आजार
देशावर जीवघेण्या ड्रग्सचे सावट
सहनशीलतेचा अंत नका पाहू
प्रबोधनकारांनी ढोंगावर लाथ मारायला शिकवले
अशिक्षितांच्या हाती लोकशाही, देश गेल्याची किंमत आपण मोज
ईपीएफओमध्ये १०० कोटींहून अधिकचा घोटाळा
बामसेफ आणि राष्ट्रीय मूलनिवासी संघाचे ३८ वे संयुक्त राष
गेल्या २० वर्षांत मुस्लिम लोकसंख्या झाली कमी
अजय मिश्रा यांना मंत्रीपदावरून हटवा, अन्यथा सोमवारी देश
स्वत:चे अपयश झाकण्यासाठी पद्धत ‘अशास्त्रीय’ असल्याचे स
शिक्षकाकडून अनु.जातीच्या विद्यार्थ्याला केस ओढून लाथा-
सनातन संस्थेसहित देशात १० आतंकवादी संघटना
आरोग्य विभागाचा गोंधळ सुरुच, वेगवेगळ्या संवर्गाच्या पर
भारतात दरवर्षी ४० टक्के अन्न होते खराब, २० कोटी लोक दररोज
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper