×

भाजपला पराभूत करण्यासाठी उत्तर प्रदेशात आघाडी झाल्यानंतर महाआघाडी करणार

Published On :    9 Oct 2021  By : MN Staff
शेयर करा:


लखनौमधील बहुजन मुक्ती पार्टीच्या महारॅलीत वामन मेश्राम यांची घोषणा





लखनौ: भाजपला पराभूत करण्यासाठी प्रथम उत्तर प्रदेशात आघाडी झाल्यानंतर महाआघाडी करणार असल्याची घोषणा बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी केली. लखनौच्या माता रमाबाई आंबेडकर मैदानावर आयोजित केलेल्या बहुजन मुक्ती पार्टीच्या महारॅलीत ते बोलत होते. बहुजननायक मान्यवर कांशीरामजी यांच्या स्मृतीदिनानिमित्त ही बहुजन मुक्ती पार्टीच्या समर्थनात ही महारॅली आयोजित करण्यात आली होती.


ते म्हणाले, भाजपला पराभूत करण्यासाठी आम्ही आधी आघाडी करू आणि नंतर धर्मनिरपेक्ष आणि परिवर्तनवादी लोकांसोबत एक महाआघाडी करू. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात भाजपला पराभूत करण्यासाठी शेकडो राजकीय पक्ष आमच्याकडे आले आणि आमच्या नेतृत्वाखाली आघाडी आणि महाआघाडी करण्याचा प्रस्ताव मांडला. जर स्वत: राजकीय पक्ष माझ्या नेतृत्वात महाआघाडी बनवू इच्छितात तर मी त्याला तयार आहे. 


भाजपाला पराभूत करण्यासाठी प्रथम आघाडी आणि नंतर महाआघाडी बनवू. त्याची झलक या महारॅलीत दिसून येत आहे. आजची गर्दी उद्याच्या निवडणुकीची दिशा ठरवणार आहे आणि राज्यातील जनतेला एक नवीन पर्याय देईल. कारण यासाठी उत्तर प्रदेशचे लोकही एकत्र सहकार्य करत आहेत. राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे राष्ट्रीय संरक्षक हजरत मौलाना सज्जाद नोमानी यांच्या सहकार्याने आम्ही ही महाआघाडी तयार करत आहोत. मौलाना सज्जाद नोमानी लोकांच्या हक्कांसाठी प्रदीर्घ काळापासून सहकार्य करत आहेत आणि आजही सहकार्य करत असल्याचे मेश्राम यांनी स्पष्ट केले.


या महारॅलीचे उद्घाटन करताना राष्ट्रीय मागासवर्गीय मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल म्हणाले, राज्यातील जनता भाजपच्या योगी सरकारला कंटाळली आहे, सर्वत्र अराजक पसरलेले आहे. राज्यात कायद्याच्या जागी गुंडा राज निर्माण झाले आहे. या गुंडा राजमध्ये गायीच्या नावावर अनुसूचित जातीचे लोक मारले जात आहेत, नक्षलवादाच्या नावाखाली आदिवासींची कत्तल केली जात आहे. 


मुस्लिमांना कधी गोमांसच्या नावावर तर कधी मॉब लिंचिंगच्या नावाखाली मारले जात आहे, तर ओबीसींना बनावट चकमकीत मारले जात आहे. एवढेच नव्हे तर राज्यात महिला आणि मुलीही सुरक्षित नाहीत. म्हणजेच राज्यातील जनता योगी सरकारवर नाराज आहे आणि त्यांना परिवर्तन हवे आहे.  ज्या मूलनिवासी बहुजन समाजावर इतका अन्याय होत आहे आणि सरकार तमाशा पाहत आहे, अशा सरकारने राजीनामा द्यावा. राज्यातील सरकार बदलले पाहिजे असे आम्हांला वाटते. म्हणूनच आम्ही या महाआघाडीला पाठिंबा देत आहोत व सहकार्य करत आहोत.



राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे राष्ट्रीय संरक्षक हजरत मौलाना सज्जाद नोमानी यांनी जनतेला संदेश देताना सांगितले की, प्रत्येकाने दडपशाहीविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. सर्व लोकांनी हक्कांचे रक्षण करण्यासाठी एकता प्रस्थापित केली पाहिजे. न्याय प्रस्थापित करण्यासाठी, तुम्हांला आंदोलनासाठी  जीव द्यावा लागला तरी तुम्ही मागे हटू नये. ही परिस्थिती केवळ एका राज्यातच नाही तर संपूर्ण देशात आहे. म्हणूनच सरकार बदलणे अत्यंत आवश्यक आहे.


उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा महाआघाडीची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी महाआघाडीची घोषणा कोणत्याही राजकीय विचारपीठावरून केलेली नाही, तर सामाजिक संघटनेच्या एका प्रचंड विचारपीठावरून करण्यात आली आहे. राज्यात भाजपला पराभूत करण्यासाठी, बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा आणि सामाजिक संघटनांचे लोक पुढे येऊ लागले आहेत. या घोषणेनंतर भाजपला घाम फुटू लागला आहे.


उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे राज्यात राजकीय वातावण तापले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश निवडणुकीत नवा ट्विस्ट दिसू लागला आहे. बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक आणि भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम हे  राजकीय पक्ष चालवत नाहीत.   पण, त्यांनी राज्यात भाजपला पराभूत करण्याची तयारी सुरू केली आहे.


बहुजन मुक्ती पार्टीचे कार्याध्यक्ष प्रवेन्द्र प्रताप सिंह, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस मनोज कुमार, राष्ट्रीय सरचिटणीस मोहम्मद कामिल, बहुजन मुक्ती पार्टी महिला सेलच्या राष्ट्रीय अध्यक्ष किरण चौधरी, प्रदेशाध्यक्ष, प्रा. रामधानी दिनकर, पक्षाचे कार्याध्यक्ष प्रदेशाध्यक्ष ऍड. दानिश अलीसहीत लंडनहून आलेले हरबंसलाल बिर्दी,  राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष अब्दुल हमीद अझहरी, प्रदेश उपाध्यक्ष जितेंद्र राजभर, राजेंद्र यादव, प्रेमकुमार गेडाम, लक्ष्मीनारायण सौदे, ज्योती भारती, रामसुरेश वर्मा आणि डॉ. रघुनंदन निषाद यांनी संबोधित केले. 


याशिवाय सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओम प्रकाश राजभर, जन अधिकार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबूसिंह कुशवाह, भारतीय वीर दलचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय कसाना, शोषित समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सी. एस. धनगर, पीस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अयुब खान, अपना दल (कमेरावादी) कडून कृष्णा पटेल, पल्लवी पटेल, राष्ट्रीय लोक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयंत चौधरी यांनीही रॅलीला संबोधित केले. 


तर जनक्रांती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश चौहान, राष्ट्रीय मजदूर किसान पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय आंबेडकर, लोकशाही न्याय पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस मनोज वाल्मिकी, जनता उन्नत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल सिंह चौहान, राष्ट्रीय लोक समता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कैलास नाथ यादव, इंडियन युनियन मुस्लिम लीगचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. कादर मोहिदीन, बहुजन आवाम पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवशक्ती वर्धन, महान समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष इतवारीलाल शाक्य, इंसाफवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अवधेश यादव, गदर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यनाथ मौर्य, राष्ट्रीय भागीदारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीकांत शाहू यांनी महारॅलीला उपस्थित राहत महारॅली यशस्वी केली. 


या महारॅलीला राज्यातील सर्व जिल्ह्यांतून लाखो लोक उपस्थित होते. संपूर्ण रमाबाई आंबेडकर मैदान गर्दीने गच्च भरलेले होते. सूत्रांनी सांगितले की, महारॅलीच्या एक दिवस आधी, लखनौमध्ये लोकांची गर्दी जमू लागली आणि केवळ बहुजन मुक्ती पार्टीचे समर्थक दिसत होते. यावरून एक दिवस आधी हजारो बसेस लखनौला पोहोचल्या होत्या.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
ओबीसींच्या जातनिहाय जगणनेसाठी १० डिसेंबरला भारत बंद कर
विमानाच्या इंधनापेक्षाही बाईक, गाड्यांचे इंधन महाग
१३ लाखांहून अधिक नमुन्यांपैकी १.११ लाखांहून अधिक दूषित
व्यथा आगरी कोळी मच्छिमारांच्या...
४१ टक्के नागरिकांना पाठीच्या मणक्याचा जडला आजार
देशावर जीवघेण्या ड्रग्सचे सावट
सहनशीलतेचा अंत नका पाहू
प्रबोधनकारांनी ढोंगावर लाथ मारायला शिकवले
अशिक्षितांच्या हाती लोकशाही, देश गेल्याची किंमत आपण मोज
ईपीएफओमध्ये १०० कोटींहून अधिकचा घोटाळा
बामसेफ आणि राष्ट्रीय मूलनिवासी संघाचे ३८ वे संयुक्त राष
गेल्या २० वर्षांत मुस्लिम लोकसंख्या झाली कमी
अजय मिश्रा यांना मंत्रीपदावरून हटवा, अन्यथा सोमवारी देश
स्वत:चे अपयश झाकण्यासाठी पद्धत ‘अशास्त्रीय’ असल्याचे स
शिक्षकाकडून अनु.जातीच्या विद्यार्थ्याला केस ओढून लाथा-
सनातन संस्थेसहित देशात १० आतंकवादी संघटना
आरोग्य विभागाचा गोंधळ सुरुच, वेगवेगळ्या संवर्गाच्या पर
भारतात दरवर्षी ४० टक्के अन्न होते खराब, २० कोटी लोक दररोज
दररोज ३० लाख मुलांना पुरेल इतके अन्नधान्य गोदामात जाते व
स्वाभीमानाची ज्योत पेटवणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper