×

कमलनाथ यांचा मुलगा आणि ऑगस्टा वेस्टलँडच्या मुख्य आरोपींची नावे पँडोरा पेपर्समध्ये

Published On :    12 Oct 2021  By : MN Staff
शेयर करा:


लपवलेल्या संपत्तीमध्ये बड्या धेंड्यांची नावे





नवी दिल्ली: लपवलेल्या संपत्तीमध्ये बड्या धेंड्यांची नावे पँडोरा पॅपर्समध्ये समोर आली आहेत. यामध्ये मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचा मुलगा बकुलनाथ यांचेही नाव उघड झाले आहे. याशिवाय वादग्रस्त ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याशी संबंधित लोकांची नावेही समाविष्ट आहेत.इंडियन एक्स्प्रेसनुसार, ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील आरोपी राजीव सक्सेनाचे नावही यात समाविष्ट आहे.


ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळा वर्ष २०१३ मध्ये यूपीए सरकारच्या काळात समोर आला होता. यामध्ये अनेक भारतीय राजकारणी आणि लष्करी अधिकारी यांच्यावर ऑगस्टा वेस्टलँडकडून भरमसाठ लाच घेतल्याचा आरोप आहे. 


या प्रकरणात राजीव सक्सेना, जो सध्या जामिनावर बाहेर आहे, यांच्या चौकशीदरम्यान बकुलनाथचे नाव पुढे आले. सक्सेना यांना दिल्लीस्थित वकील गौतम खेतान यांच्या सहकार्याने इंटरस्टेलर टेक्नॉलॉजीजच्या खात्यात ऑगस्टा वेस्टलँडकडून १२.४० दशलक्ष युरो मिळाले होते. हा पैसा इतर मध्यस्थ आणि सरकारी अधिकार्‍यांना लाच देण्यासाठी वापरला गेला.


नोव्हेंबर २०२० च्या इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालानुसार सक्सेना चौकशीदरम्यान म्हणाले होते, आम्ही (ते आणि सह आरोपी सुशेन मोहन गुप्ता) जॉन डोकर्टी यांच्या व्यवस्थापित कंपनी प्रिस्टिन रिव्हर इन्व्हेस्टमेंट्सद्वारे कमलनाथ यांचा मुलगा बकुलनाथसाठी पुलाचा निधी प्राप्त केला होता. 


हे पण वाचा: भारतीयांच्या काळ्या पैसेधारकांची तिसरी यादी सादर; मात्र नावे सांगण्यास नकार


अशा प्रकारे अप्रत्यक्षपणे इंटरस्टेलर टेक्नॉलॉजीजचे पैसे प्रिस्टिन रिव्हर इन्व्हेस्टमेंट कडून कर्ज फेडण्यासाठी वापरले गेले.आता पेंडोरा पेपर्स द्वारे हे समजले आहे की डॉशर्टी, एक स्विस नागरिक, बाकुलनाथशी ऑफशोर कंपनीद्वारे जोडला गेला आहे, ज्याची स्थापना फेब्रुवारी २०१८ मध्ये ट्रायडंट ट्रस्टने केली होती. टॅक्स हेव्हन्स मधील स्पेक्टर कन्सल्टन्सी सर्व्हिस लिमिटेड कंपनीचे पहिले संचालक आहेत आणि बकुळनाथ हे बेनिफिशियल मालक आहेत, ज्यात त्यांचा दुबईचा पत्ता दिला आहे.


हे पण वाचा:  पँडोरा पेपर्समध्ये भाजप नेत्या वसुंधरा राजे यांच्या सुनेचेही नाव



दुसरीकडे, दुसरी ऑफशोर कंपनी, सेलब्रुक लिमिटेड, स्पेक्टर कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडचा भागधारक म्हणून दाखवली गेली आहे. याशिवाय, ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातील आरोपी राजीव सक्सेना याने तनय होल्डिंग्स लिमिटेड नावाच्या ब्रिटिश व्हर्जिन एक ट्रस्ट बनवला आहे. 


२०१४ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीमध्ये त्याच्या वैयक्तिक मालमत्तेचे शेअर्स गुंतलेले होते.अहवालानुसार सक्सेनाने मॅट्रिक्स इंटरनॅशनल लिमिटेड नावाची दुसरी कंपनी स्थापन केली होती. तथापि, ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा उघडकीस येण्याच्या आणि त्याच्या अटकेच्या एक महिना आधी त्याने या दोन्ही कंपन्या बंद करण्याचे निर्देश गुप्तपणे दिले.


हे पण वाचा: करसवलत आणि करमाफीसाठी भारतातील धनाढ्यांची परदेशांत गुप्त गुंतवणूक 



या व्यतिरिक्त, दिल्लीतील वकील आणि गौतम खेतान, ज्यांना डिसेंबर २०१६ मध्ये ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात आयएएफचे माजी प्रमुख एसपी त्यागी यांच्यासह अटक करण्यात आली होती, तेही टॅक्स हेवनमध्ये असलेल्या कंपन्यांशी संबंधित आहेत.


अहवालानुसार, खेतान यांनी लंडनस्थित रेस्टॉरंटचे मालक आदित्य खन्ना आणि नवी दिल्लीतील हयात हॉटेल आणि काठमांडूमधील याक अँड यति हॉटेलचे मालक राधे श्याम सराफ यांच्यासाठी ऑफशोर ट्रस्ट उभारण्यात संरक्षकाची भूमिका बजावली. ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील आणखी एक आरोपी सुशेन मोहन गुप्ताचा ट्रस्टही टॅक्स हेव्हन्समध्ये आहे. पेंडोरा पेपर्सच्या कागदपत्रांनुसार, २००५ मध्ये गुप्ताचे वडील देव मोहन गुप्ता यांनी टॅक्स हेव्हन्स बेलीजमध्ये लँग ट्रस्ट नावाचा ट्रस्ट स्थापन केला होता, ज्यामध्ये सुशेन मोहन गुप्ता आणि त्याची आई शुभ्रा गुप्ता लाभार्थी होते.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
ओबीसींच्या जातनिहाय जगणनेसाठी १० डिसेंबरला भारत बंद कर
विमानाच्या इंधनापेक्षाही बाईक, गाड्यांचे इंधन महाग
१३ लाखांहून अधिक नमुन्यांपैकी १.११ लाखांहून अधिक दूषित
व्यथा आगरी कोळी मच्छिमारांच्या...
४१ टक्के नागरिकांना पाठीच्या मणक्याचा जडला आजार
देशावर जीवघेण्या ड्रग्सचे सावट
सहनशीलतेचा अंत नका पाहू
प्रबोधनकारांनी ढोंगावर लाथ मारायला शिकवले
अशिक्षितांच्या हाती लोकशाही, देश गेल्याची किंमत आपण मोज
ईपीएफओमध्ये १०० कोटींहून अधिकचा घोटाळा
बामसेफ आणि राष्ट्रीय मूलनिवासी संघाचे ३८ वे संयुक्त राष
गेल्या २० वर्षांत मुस्लिम लोकसंख्या झाली कमी
अजय मिश्रा यांना मंत्रीपदावरून हटवा, अन्यथा सोमवारी देश
स्वत:चे अपयश झाकण्यासाठी पद्धत ‘अशास्त्रीय’ असल्याचे स
शिक्षकाकडून अनु.जातीच्या विद्यार्थ्याला केस ओढून लाथा-
सनातन संस्थेसहित देशात १० आतंकवादी संघटना
आरोग्य विभागाचा गोंधळ सुरुच, वेगवेगळ्या संवर्गाच्या पर
भारतात दरवर्षी ४० टक्के अन्न होते खराब, २० कोटी लोक दररोज
दररोज ३० लाख मुलांना पुरेल इतके अन्नधान्य गोदामात जाते व
स्वाभीमानाची ज्योत पेटवणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper