×

महाराष्ट्राने थकविले कोळशाचे ३ हजार कोटी, ४ राज्यांकडे ८ हजार थकीत

Published On :    13 Oct 2021  By : MN Staff
शेयर करा:


त्वरित पैसे देण्याची राज्यांना सूचना





नवी दिल्ली: देशभरात कोळसा टंचाई आणि त्यामुळे विजेचे संकट ओढावलेले असतानाच महाराष्ट्रासह काही राज्यांकडे जवळपास आठ हजार कोटी रुपयांची कोळशाची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. या राज्यांनी ही थकबाकी लवकर भरावी, अशा सूचना केंद्र सरकारने केली आहे.  


महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि राजस्थान या राज्यांकडे ७ हजार ९७४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. कोळशा खरेदीपोटी कोल इंडियाकडे हे पैसे थकीत आहेत. मोठ्या प्रमाणावर थकबाकी असल्यामुळे राज्यांना पुरेसा कोळसा साठा ठेवण्यात अडचणी निर्माण झाल्या, असे केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.


या राज्यांमध्ये सर्वाधिक औष्णिक वीजनिर्मिती होते. जेमतेम एक किंवा दोन दिवस पुरेल एवढा कोळशाचा साठा या चार राज्यांकडे आहे. तर गेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस कोल इंडियाची देशातील सर्व वीजनिर्मिती कंपन्या आणि वीज मंडळांची २१ हजार ६१९ कोटी रुपयांची थकबाकी होती.


गेल्या काही दिवसांमध्ये देशातील विजेची मागणी वाढली आहे. मात्र, कोळसा पुरवठ्यातील अडचणी तसेच अपुरा साठा असल्याने वीजनिर्मितीत घट झाली आहे. केंद्रीय वीज नियामक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १५ ते ३० दिवसांचा साठा ठेवणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात अनेक ऊर्जा प्रकल्पांमध्ये एक ते चार दिवसांचाच साठा आहे.  महाराष्ट्राकडे (३,१७६.१ कोटी), उत्तर प्रदेशकडे (२,७४३.१ कोटी), तामिळनाडूकडे (१,२८१.७ कोटी), राजस्थानकडे (७७४ कोटी) थकबाकी आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
गुन्हेगारीमध्ये तामिळनाडू नंबर १, महाराष्ट्र पाचवे; उत्
शेतकरी आंदोलकांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर भाजप प
उपासमारीने ग्रस्त असलेल्या भारतात १२ मंत्र्यांनी खरेदी
भारतात क्षयरोगामुळे गेल्या वर्षभरात १५ लाख लोकांचा मृत
ओबीसींच्या जातनिहाय जगणनेसाठी १० डिसेंबरला भारत बंद कर
विमानाच्या इंधनापेक्षाही बाईक, गाड्यांचे इंधन महाग
१३ लाखांहून अधिक नमुन्यांपैकी १.११ लाखांहून अधिक दूषित
व्यथा आगरी कोळी मच्छिमारांच्या...
४१ टक्के नागरिकांना पाठीच्या मणक्याचा जडला आजार
देशावर जीवघेण्या ड्रग्सचे सावट
सहनशीलतेचा अंत नका पाहू
प्रबोधनकारांनी ढोंगावर लाथ मारायला शिकवले
अशिक्षितांच्या हाती लोकशाही, देश गेल्याची किंमत आपण मोज
ईपीएफओमध्ये १०० कोटींहून अधिकचा घोटाळा
बामसेफ आणि राष्ट्रीय मूलनिवासी संघाचे ३८ वे संयुक्त राष
गेल्या २० वर्षांत मुस्लिम लोकसंख्या झाली कमी
अजय मिश्रा यांना मंत्रीपदावरून हटवा, अन्यथा सोमवारी देश
स्वत:चे अपयश झाकण्यासाठी पद्धत ‘अशास्त्रीय’ असल्याचे स
शिक्षकाकडून अनु.जातीच्या विद्यार्थ्याला केस ओढून लाथा-
सनातन संस्थेसहित देशात १० आतंकवादी संघटना
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper