×

बुद्धांचा वारसा हा तमाम ५२ टक्के ओबीसींचा

Published On :    23 Nov 2021  By : MN Staff
शेयर करा:


बहुजनांच्या कल्याणासाठी बुद्धीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कने प्रचारक निर्माण करावेत-पवनी, भंडारा येथे तिसर्‍या राज्यस्तरीय अधिवेशनात वामन मेश्राम यांचे आवाहन

पवनी: बुद्धांचे जे शाक्य कूल आहे. तर उत्तर भारतात शाक्य जाती आहे. ते मंडल आयोगात ओबीसीमध्ये येतात. या पद्धतीने आपण लक्षात घेतले तर बुद्धांचा वारसा हा तमाम ५२ टक्के ओबीसींचा आहे. ओबीसींना हे माहित नाही, मात्र ज्यांना माहित पडले आहे त्यांनी ते सांगायला हवे. त्यांच्यावर ती जबाबदारी आहे असे सांगतानाच बहुजनांच्या कल्याणासाठी बुद्धीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कने प्रचारक निर्माण करावेत असे आवाहन बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केले. पवनी, भंडारा येथे बुद्धीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या तिसर्‍या राज्यस्तरीय अधिवेशनात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.  यावेळी विचारपीठावर बुद्धीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे राष्ट्रीय प्रभारी डॉ.विलास खरात, राज्य प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब धावारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


मेश्राम म्हणाले, अनेक बाबींचे जे ब्राम्हणायझेशन झाले आहे, त्यामागे रामायण, महाभारत या ब्राम्हणी ग्रंथांचा मोठा वाटा आहे. त्याबाबत आपल्या लोकांनी समजणे जरूरीचे आहे. इसापूर्व १८५ च्या पहिले सम्राट बृहद्रथ मौर्य यांची हत्या करण्यात आली. बुद्धांनी मन, मस्तिष्क मुक्त केले नसते तर चंद्रगुप्त मौर्य यांची क्रांती झाली नसती. खरी बाब लक्षात यावी म्हणून हे सांगत आहे. ब्राम्हण नेममीच प्रचार करतो की, आमचा धर्म प्राचीन...प्राचीन..प्राचीन...प्राचीन...प्राचीन आहे. अरे, किती प्राचीन आहे. तुम्ही तर रामायण बुद्धांच्या ८०० वर्षानंतर लिहले आहे. त्या रामायणात दोन श्‍लोक बुद्धांच्या विरोधात लिहले आहे. जर ते बुद्धांच्या पूर्वी लिहले असते, बुद्ध जन्माच्या अगोदर लिहले असते तर बुद्धाच्या बाबतीत दोन श्‍लोक कसे आले असते? आता नवीन संशोधन आले आहे. इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठातील प्राध्यापकांनी संशोधन केले आहे की, १६ वेळा बुद्धांचा उल्लेख आहे वाल्मिकी रामायणात. हे रामायण इसापूर्व १८५ साल सम्राट बृहद्रथ मौर्य यांची पुश्यमित्र शुंगच्या माध्यमातून हत्या केल्यानंतर निर्माण झाले आहे. मौर्य बुध्दांच्या नंतर, बुद्ध मौर्य यांच्या पहिले. मौर्य यांचे दहा राजा, त्यानंतर त्यांची हत्या. अनुकूल राज्य स्थापित झाल्यानंतर रामायण लिहण्याचे काम का करण्यात आले? बुध्दांनी आपल्या प्रवचनात जातक कथांची उदाहरणे दिली आहेत. दशरथ जातकमध्येही राम आहे. मात्र तो बोधीसत्व राम आहे. दशरथ जातक कथेत सीताही आहे. अरे किती चोरी करणार असा सवाल मेश्राम यांनी केला.


अयोध्येत रामाचा जन्म झाला असे ब्राम्हण लोक सांगतात, मग रामलल्लाची मूर्ती अयोध्येत मिळायला हवी होती, मात्र ती गोरखपूरवरून आणण्यात आली. अयोध्या साकेत आहे. तेथे तीन हजार भिक्खूंसाठी संघाराम होते. १६ वर्षे बुद्ध साकेतमध्ये राहत होते. काहींनी धम्मपदाचा उल्लेख केला.  त्या धम्मपदात सनातन शब्द आहे. ब्राम्हण लोक सनातन धर्म असा प्रचार करतात. याचा शब्दप्रयोग करतात. सनातन नावदेखील त्यांनी चोरले आहे. सनातन शब्ददेखील ब्राम्हणांचा नाही. ही केवळ चोरी नसून डाका आहे. भिक्खू लोकांना ते माहित आहे. ब्राम्हण लोक चार्तुमास शब्दाचा प्रयोग करतात. बुध्दांचा चार महिन्याचा वर्षावास व्हायचा. ब्राम्हणांनी त्यालाच चोरले आणि चार्तुमास असे नाव दिले. वर्षावासचे नाव केवळ चार्तुमास असे केले. अशा अनेक बाबी त्यांनी चोरल्या आहेत. 


हे पण वाचा: आरएसएसला आव्हान देण्याचे काम बुद्धीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कद्वारा केले जाणार


एकतर्फी त्यांनी बहुजनांच्या शिक्षणावर बंदी लादली. त्यामुळे शिकता आले नाही.परिणामी जो बौद्धीक वर्ग जो निर्माण व्हायला हवा होता तो झाला नाही. इंग्रजांनी कांही लोकांना मिलीटरीत भरती केले. त्यांच्या मुलांनाही शिक्षणाचा अधिकार बहाल केला. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण व्हावे असे इंग्रजांना वाटत होते. त्यामुळे पहिल्यांदा त्यांनी कोलकत्यात विश्‍वविद्यालय निर्माण केले. मी दोन या तीनवेळा नालंदाला गेलो होतो. एक छोटे पुस्तक खरेदी केले. ते पुस्तक वाचले तेव्हा त्या पुस्तकात एक लाईन होती, ती म्हणजे नालंदा नावाचा एक नाग होता. नालंदा हा एक संपन्न व्यक्ती असावा. त्याच्याजवळ मोठ्या प्रमाणात जमीन असावी. त्याने ती जमीन दान दिली असावी. त्यामुळे त्याचे नाव नालंदा पडले असावे. मुचलिंद नागाला साप दाखवण्यात आले आहे. बुद्धांच्या काही मूर्तीवरही छत्र धारण केलेले नाग दिसतात.याचा अर्थ नागांनी बुद्ध धम्माला राजाश्रय दिला होता असा एक अर्थ निघतो. मी काही पुरातत्व विभागाचा तज्ञ नाही, मात्र इतिहास विषय माझा आवडता आहे. इतिहासाच्या पुढे प्राच्यविद्या असते. प्राच्यविद्येने माहिती मिळते. नागांनी बुद्ध धम्माला राजाश्रय दिला होता. ही बाब ऐतिहासिक आहे. 


मौर्य साम्राज्य नाग लोकांचे होते. नाग लोकांचे साम्राज्य अफगाणिस्ताच्यापुढेही पसरले होते. आजच्या घडीला एखादा अफगाणिस्तानचा माणूस भारतात वास्तव्य करत असेल तर त्याला मी भारतीय मानतो. ब्राम्हण त्याला विदेशी म्हणू शकतात. मात्र तो विदेशी नाही. ब्राम्हणांमुळे भारताचा नकाशा छोटा झाला आहे. मौर्य यांचा विशाल भारत होता. यामुळे ब्राम्हणांवर देशद्रोहाचा आरोप लावला जाऊ शकतो. मात्र मी तो आरोप लावत नाही. कधी कधी मी विचार करतो हे देशातील मूलनिवासी नाहीत. त्यांना देशद्रोहाचा आरोप कसा काय लावू? कधी कधी हेदेखील माझ्या डोक्यात येते. त्यामुळे मी द्वीविधा मनस्थितीत आहे. देशद्रोहाचा आरोप लावू की नको लावू. ते मूलनिवासी नसल्याने त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लागू शकत नाही. त्यांच्यावर दुसरा मोठा आरोप लागेल, ‘तुम्ही मूलनिवासी नाहीत’. हा देशद्रोहापेक्षा मोठा आरोप आहे. त्यामुळे त्यांना भीती वाटते असे मेश्राम म्हणाले.


आपला एखादा माणूस देशपांडे, कुलकर्णीकडे पाहून जयभीम म्हणतो. परंतु तो ब्राम्हण जयभीम म्हणत नाही. एक दिवस कांबळेने देशपांडे व कुलकर्णीला म्हटले, ‘जय मूलनिवासी’. दुसर्‍या दिवशी देशपांडे त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, कांबळे...बाबासाहेबांनी किती तुमच्यासाठी आयुष्य संपवले  आणि तुम्ही विसरलात जय भीम बोलायला. आलं का लक्षात, महत्वाची गोष्ट सांगतोय. त्याला, जयभीम ठिक आहे, जय मूलनिवासी भयंकरच आहे. ब्राम्हणाला जे समजते ते आपल्या लोकांना समजत नाही. बुद्धांच्या संदर्भात पाहिले तर अमिताभ हेदेखील बुद्धांचे नाव आहे. विदेशातून कोणी मोठा व्यक्ती आला तर प्रधानमंत्री गांधीला बाजूला हटवतो आणि बुद्धांची मूर्ती समोर ठेवतो. विदेशात रामायण, महाभारत पौराणिक पात्र मानतात. पौराणिक पात्रांना ते ऐतिहासिक मानत नाहीत. महाराष्ट्र अथवा कांही राज्यात एखादा व्यक्ती मरतो त्यावेळी मयताच्या मागे असणारे लोक ‘रामनाम सत्य है’ तर बंगालमध्ये ‘हरीबोल’ असा शब्दप्रयोग करतात. ‘हरी’देखील बुद्धाचे नाव आहे. हीच परंपरा आपल्या जीवनाचे आचरण आहे. पंढरपूरमध्येही ‘हरी’ शब्द मोठ्या प्रमाणात येतो. ‘हरी भक्त परायण’. संत नामदेव गर्भगृहात जायचे. त्यांनी गर्भगृहात स्वत:च्या डोळ्यांनी मूर्ती पाहिली. आपल्या डोळ्यांनी पाहिले त्याचा अभंग केले. त्यामध्येही त्यांनी बुद्ध लिहला आहे असे मेश्राम यांनी सांगितले.


ज्यावेळी १४ वर्षाचा वनवास भोगून राम आयोध्येत आले, त्यावेळी त्यांचे दिवे लावून स्वागत करण्यात आले. परंतु ऐतिहासिक पुरावा असा आहे की, बुद्धांना ज्यावेळी ज्ञानप्राप्ती झाली त्यानंतर ते आपल्या कपिलवस्तू या गावात आले त्यावेळी तेथील लोकांनी त्यांचे दिवे लावून स्वागत केले होते. हेदेखील ब्राम्हणांनी चोरले. हे डाका टाकण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. त्यांचे हे संस्कार आहेत. त्याला ते महान बोलतात. त्याला महान बोलता येणार नाही. ज्या संस्कृतीने लोकांना अस्पृश्य बनवले ती महान कशी काय असू शकते असा सवाल मेश्राम यांनी केला. अस्पृश्यसारखी घटीया संस्कृती निर्माण केलीत तर तुमची फॅक्टरी मोठी कशी असेल? घटीयाच मानावी लागेल. आणखी एक शब्दाचा उपयोग करतात, ‘वसुधैव कुटुंबकम’. सार्‍या देशभरात हजारो कि.मी.लोक पायी चालत होते. त्यावेळी ‘वसुधैव कुटुंबकम’ असे ब्राम्हणी सरकारला का वाटले नाही? असा सवाल त्यांनी केला.


बुद्धांचे जे शाक्य कूल आहे. तर उत्तर भारतात शाक्य जाती आहे. ते मंडल आयोगात ओबीसीमध्ये येतात. अशा पद्धतीने पाहिले तर बुद्धांचा वारसा हा तमाम ५२ टक्के ओबीसींचा आहे. याचा अर्थ हा वारसा ओबीसींचा आहे. ओबीसीला याची माहिती नाही. त्यामुळे त्यांना माहिती देणे आपले काम आहे.ज़्याला पहिल्यांदा समजले आहे त्याने सांगितले पाहिजे. ज्ञान वाटल्याने ते कधीच कमी झालेले नाही. विद्यापीठात लोकांना ज्ञानी केले जाते. ज्ञानी असलेले लोक ज्ञानाचा प्रचार करतात. बुद्धांनी आपले ज्ञान जगाला वाटले. एक महत्वपूर्ण बाब ब्राम्हणांनी वर्णसंस्था निर्माण केली तर आपल्या महापुरूषांनी गणसंस्था निर्माण केली. बुद्ध गणसंस्थेचे निर्माते होते. वर्णसंस्थेत ब्राम्हण,क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र. यातील क्षत्रिय वर्णाला राजा बनण्याला पूर्वशर्थ होती. मात्र गणसंस्थेत राजा रोटेशन पद्धतीने बनत होता. गणसंस्थेत क्षत्रिय होणे पूर्वशर्थ नव्हती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहले आहे की, बुद्धाचे वडील शुद्धोधन शेतीत नांगर चालवत होते. बुद्ध त्यावेळी ध्यानस्थ बसले होते. देवदत्तने एका पक्षाला मारले आणि तो पक्षी ध्यानस्थ बसलेल्या बुद्धाच्या समोर तडफडून पडतो. राजा आणि नांगर चालवणे विरोधाभासी वाटतो. मात्र रोटेशन पद्धतीने राजा बनत असेल तर शेतीत नांगर चालवायला हवे. कारण तेथे रोटेशन पद्धतीने राजा बनता येत होते. रोटेशन पद्धतीने जे राजा बनतात त्यालाही एक संस्कार असतो. ते संस्कार म्हणजे त्याला तलावात आंघोळ करावी लागते. तो तलाव राखीव असतो. त्या तलावाला पुष्करणी बोलले जाते. राजस्थानमध्ये एक पुष्कर जिल्हा किंवा केंद्र आहे. याबाबत राजस्थानमधील लोकांना विचारले, की पुष्करमध्ये तलाव आहेत का? तर तेथील लोकांनी सांगितले की, अनेक सारे तलाव आहेत. तलावामुळे त्याला पुष्कर नाव पडले असावे याची माहिती मेश्राम यांनी दिली.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की, भिक्खू संघाची पुर्नरचना करावी लागेल. आज वर्तमान परिस्थितीत या बाबीला पुढे घेऊन जायचे असेल तर भिक्खू संघाची पुर्नरचना करावी लागणार आहे. कॅथॉलिक आणि प्रोटेस्ट ख्रिश्‍चन लोकांनी वेगवेगळी पद्धत बनवली आहे. कॅथॉलिक पारंपरिक व प्रोटेस्ट लोकांनी पुर्नरचना केली आहे. पुर्नरचना केल्याने आपल्याला त्याचा फायदा होईल. पुढे जाण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती शोधून पहायला हव्यात. मला वाटते की, बुद्धीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कला आव्हानात्मक कामे जास्त आहेत. त्यासाठी खोलवर चिंतन करून होमवर्क करावे लागणार आहे. मी एक प्रचारक आहे. परंतु मी काही काशाय वस्त्रधारी नाही. ‘चरथ भिक्खवे चारिकमं, बहुजन हिताय, बहुजन सुखाय, अत्तानु हिताय, लोकानु कंपाय, आदि कल्याण, मध्य कल्याण, अंत कल्याण’चे काम रोजचे करत आहे. गेल्या ४५ वर्षापासून करत आहे. एवढेच नाही तर बहुजनांचे काम करत आहे. काही लोकांचा माझ्यावर आरोप आहे की, वामन मेश्राम बाकी सर्व करतात, मात्र बुद्धांचे काम करत नाहीत. आपल्या लोकांची जी समज आहे ती अशी आहे. मुलाची सहा महिन्यात प्रसुती करू शकत नाही. त्याची आई व मुलाला त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्या मुलाची प्रसुती ९ महिन्यानंतरच बरोबर आहे. प्रत्येक कामात एक परिपक्वता असते. परिपक्व स्थिती लक्षात घेऊन काम करायला हवे. उचित वेळेत उचित काम करायला हवे. ही बाब आपल्या लोकांच्या लक्षात आली तर त्याचा फायदा होईल. तर बहुजनांच्या कल्याणासाठी काम करणारे बुद्धीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कने प्रचारक निर्माण करायला हवेत असे आवाहन मेश्राम यांनी केले.PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Hereसंपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सार्वजनिक सेवेचे ब्राम्हणीकरण म्हणजेच भांडवलीकरण
शोषितांचा आणि शोषकांचा धर्म एक कसा?
१३ कोटींचा पेपर प्रिंटिंग कंपनीकडे ना प्रिंटिंग मशीन, ना
शेतकरी आंदोलन: गुन्हे मागे घेईपर्यंत घरी परतणार नाही
पशूंवरील अत्याचाराचे ३३८ खटले
ओबीसींची जातनिहाय जनगणना न केल्यास देशव्यापी आंदोलन कर
छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारा विदेशी ब्राम्ह
भाजपा सरकारच्या बेगडी राष्ट्रवादाचा बुरखा निती आयोगाने
८० हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा कॅगचा ठपका
नागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू
राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना अब
एसटीच्या संपकरी कर्मचार्‍यांवर उगारणार ‘मेस्मा’चा बडग
राज ठाकरेंचा ‘जय श्रीराम’ चा नारा ब्राम्हणवादाच्या मजब
परमबीर सिंगांच्या अडचणीत वाढ
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापी
जातिनिहाय जनगणना नाहीच
राजकीय पक्षांना मिळाला १ हजार १०० कोटी रुपयांचा फंड
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य प्रकाशित करण्याबाबत म
२०२० मध्ये युएपीए अंतर्गत १ हजार ३२१ लोकांना अटक
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी श्रद्धांजली अर्प
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper