×

आरएसएसला आव्हान देण्याचे काम बुद्धीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कद्वारा केले जाणार

Published On :    23 Nov 2021  By : MN Staff
शेयर करा:


पवनी, भंडारा येथे तिसर्‍या राज्यस्तरीय अधिवेशनात डॉ.विलास खरात यांचा इशारा

पवनी: आरएसएसला आव्हान देण्याचे काम बुद्धीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कद्वारा केले जाईल असा इशारा बुद्धीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे राष्ट्रीय प्रभारी डॉ. विलास खरात यांनी दिला. पवनी, भंडारा येथे तिसर्‍या राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी विचारपीठावर बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


डॉ.खरात म्हणाले, वास्तविक इतिहास असा आहे की, त्यावेळी विदर्भातील लोकांनी पुष्यमित्र शुंग याचा विरोध केला. महान सम्राट अशोक यांच नातू बृहद्रथ यांची पत्नी महाराष्ट्रातील होती. ती विदर्भातील होती आणि पवनीच्या बाजूची होती. ज्यावेळी बृहद्रथ राज्य करत होता, त्यावेळी त्यांच्या पत्नीचा भाऊ मंत्रीमंडळात होता. राजाची हत्या करण्यात आली. तो विदर्भातील मगध येथील राजा पाटलीपुत्राचे सहयोगी होते. हा विद्रोह करील म्हणून त्याला अटक करण्यात आली. तर विदर्भातील लोकांनी विद्रोह करू नये यासाठी शुंगने आपल्या मंत्र्याला पाठवले, पुत्र अग्निमित्रला पाठवले. येथील लोकांनी त्याचा मुकाबला केला. त्यावेळी शुंगच्या मंत्र्याला विदर्भातील बुद्धीस्ट लोकांनी अटक केली होती. तेथे त्यांना डावपेच करून मारले जाईल, विदर्भाचा राजा आहे त्याला संवपण्यात येईल, शुंगला प्रस्ताव पाठवण्यात आला. तुम्ही आमच्या राजाला सोडले तर तुमच्या मंत्र्याला सोडले जाईल. त्यावेळी प्राचीन भारतात विदर्भातील लोकांनी शुंगला आव्हान दिले होते.  मात्र शुंगची वर्तमान औलाद आज नागपूरमध्ये बसून देशाला चालवत आहेत, त्यांना आव्हान देण्याचे काम आम्हांला करावे लागणार आहे.


ब्राम्हण पतंजली आणि शुंगने मौर्य साम्राज्यात घुसखोरी केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, लढाई लढून बुद्धीझमला संपवण्यात आलेले नाही तर घुसखोरी तंत्राचा वापर केला. मौर्य साम्राज्याला संपवण्यासाठी राजाच्या सैन्यात घुसखोरी करून सेनापती बनून तुकडे तुकडे करून हत्या करण्यात आली. त्यामुळे ब्राम्हण लोक जे सांगतात की मौर्य साम्राज्याचे पतन कसे झाले ते खरे नाही. तर भिक्खू संघात आणि सम्राट बृहद्रथ मौर्य यांच्या सैन्यात ब्राम्हणांनी घुसखोरी केल्याने भारतातील बुद्धीझम संपले. ही बाब आपले लोक विसरले आहेत. मात्र शुंगाचे लोक विसरले नाहीत. शुंगचे लोक विसरले नाहीत यासाठीच हा विषय ठेवण्यात आला आहे. 


हे पण वाचा: बुद्धांचा वारसा हा तमाम ५२ टक्के ओबीसींचा


मोहन भागवत यांनी एक योजना बनवली. बुद्धीझमला मानणारे लोक सार्‍या जगात पसरले आहेत. ज्यांनी आम्हांला गुलाम बनवले आहे, अस्पृश्य बनवले आहे. ६.५ हजार जातीच्या तुकड्यात विभागले आहे. हेच लोक वास्तवात भारताचे मालक आहेत. त्यांचा वारसा जमीनीच्या आतमध्ये आहे. त्यांचा वारसा पहायला जगभरातील लोक येतात. त्यामुळे त्यांचा वारसा वाचू नये, ब्राम्हणी गुलामीतून स्वातंत्र्य होऊ नये आणि जगभरातील लोक यांच्या सपोर्टमध्ये येऊ नयेत, त्यासाठी विदेशी ब्राम्हण भागवत यांनी बुद्धीस्ट लोकांना भ्रमित करण्यासाठी दोन स्तरावर एक आंतरराष्ट्रीय व भारतामध्ये २०१७ मध्ये संघटन बनवले. दिल्लीत त्याचे संमेलन झाले. त्याचे मुख्य अतिथी रामदास आठवले होते. मोहन भागवत यांनी तेथे संबोधित केले. आरएसएसच्या माध्यमातून एक बुद्धीस्ट संघटन निर्माण करण्यात आले त्याचे नाव भारतीय बौद्ध संघ. गेल्या महिन्यात एक पुण्यात एक बातमी समोर आली. एक भन्ते एका घरात घुसले. त्यांना वाटले की ते भिक्खू आहेत. तेथे गेल्यानंतर तो वेदांची स्तुती करायला लागला, एवढेच नाही तर त्याने त्या लोकांना यज्ञ करा असे सांगत होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा मामला एवढा गंभीर झाला की, एक भिक्खू उपासकांच्या घरात घुसतो आणि वेदांची महती गातो. ज्यावेळी त्याला विचारले तेव्हा तो भितीने पळून गेला. त्याला पकडलेदेखील नाही. करूणा, शील आहे त्याला जाऊ दिले असे खरात यांनी सांगितले.


भारतीय बौद्ध संघाचा जो प्रमुख आहे तो गुजरातमधील एक ब्राम्हण आहे. ज्याला त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष बनवले आहे. चार महिन्यापूर्वी पुण्याच्या बाजूला त्यांची राज्यस्तरीय बैठकदेखील झाली आहे. कार्यक्रम झाला आहे. नरेंद्र मोदींचा जन्मदिन करणारा, संघाचा जयजयकार करणारा तो भिक्खू महाराष्ट्रात आला होता. अमरावती, नागपूरकडील काही बद्धीस्ट लोकांची नावे त्याच्यावर छापलेली आहेत. लालच आणि भीतीपोटी ते लोक तिकडे गेले असावेत यावरून महाराष्ट्रात भारतीय बौद्ध संघाची पाळेमुळे ते पसरू पाहत आहेत. ही गंभीर बाब आहे. ते त्यावेळी बृहद्रथ मौर्य यांचा वारसा समाप्त करत होते, आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आमच्या जबाबदारी दिली आहे त्या आंदोलनाला छिन्नविछिन्न करण्याचे त्यांचे षड्यंत्र आहे. दुश्मन संघटित पद्धतीने प्रयत्न करत आहे, साकेत आमचा वारसा आहे असे बुद्धीस्ट लोक सांगतात, मात्र त्यावरही दुश्मनाने कब्जा केला. बुद्धीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कने आंदोलन केले तेव्हा लोकांना कळले की कोणीतरी लढाई लढत आहे असे खरात म्हणाले.


दरम्यान त्यांना बुद्धीस्ट लोक समर्थन करत आहेत, विरोध करत नाहीत, हे दाखवण्यासाठी मोहन भागवत यांनी बुद्ध गयेत एका भिक्खूला पाठवले आणि अखिल भारतीय भिक्खू संघाचा संचालन करणारा भूमीहार ब्राम्हण आहे, त्याने बुद्ध गयेतील पवित्र माती एकत्र केली आणि अयोध्येतील मंदिरासाठी दान केली. त्याचा व्हिडीओ व्हायरल केला. एका बाजूला भारतीय बौद्ध संघाच्या नावावर समाजाला भ्रमित केले जात आहे तर अखिल भारतातील भिक्खू त्याच संस्थेचे सर्टीफिकेट घेतात. जी संस्था ब्राम्हणांच्या नियंत्रणात आहे. हे भिक्खू लोकांना माहित नाही. उपासकांना माहित नाही. त्यामुळे आम्ही अधिवेशन करत आहोत. येथे दुश्मनाची ओळख होत आहे. या कार्यक्रमाचे संचालन करणारे धावारे बोलत होते की, राठोड सांगत आहेत की, ओबीसी बुद्ध धम्म की ओर. रमेश राठोड सांगत आहेत की, बुद्ध धम्म आमचादेखील आहे. मात्र बाबासाहेबांच्या खानदानातील आम्ही आहोत असे सांगणारे लोक, रक्ताचे वारस सांगत आहेत की, जगनणनेत बौद्ध लिहू नका तर महार लिहा. किती उलट आहे. बाबासाहेबांच्या नावावर ज्या संस्था चालवत आहेत, किंवा चालवत होते, त्यादेखील ओरिजनल नाहीत. खोट्या संस्था चालवत आहेत. खोट्या बाबींचा ते प्रोपोगंडा करत आहेत. बाबासाहेबांचे नाव वापरून ते करत आहेत त्यांना कोण उत्तर देणार? असा सवाल खरात यांनी केला.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला धम्म दिला. महार बना असे म्हणाले नाहीत. हे लोक सांगत आहेत की, राजकीय आरक्षणाच्या जागा कमी होतील. त्यामुळे आपल्याला बौद्धसहित हिंदूदेखील आणि महारदेखील लिहावे लागणार आहे. येथीलच शाम हॉटेल नागपूरमध्ये बाबासाहेब  कार्यकर्त्यांच्या बैठकीत म्हणाले होते की, अनु.जाती, जमातीचे लोक संसद अथवा विधीमंडळात जातात ते आपले तोंडदेखील उघडत नाहीत, ते केवळ जांभई देण्यासाठी तोंड उघडतात. अशा गाढव असणार्‍या लोकांची आम्हांला गरज नाही. मी स्वत: पुढच्या निवडणुकीत 1957 च्या आरक्षित जागेवरून उमेदवार म्हणून उभा राहणार नाही. कारण मी बुद्धीस्ट झालो आहे. बुद्धीस्ट लोकांची जात नष्ट झाली आहे. जी ऑन रेकॉर्ड बाब आहे ते बाबासाहेबांच्या नावावर महाराष्ट्रातील भोळ्या भाबड्या समाजातील लोकांना भ्रमित केले जात आहे. अशा प्रकारे भ्रमित करणार्‍या लोकांना उत्तर द्यायला हवे. आंबेडकरवादी होणे याचा अर्थ सरेंडर होणे असा नाही. आंबेडकरवादी होणे म्हणजे ब्राम्हणांच्या हातून गोमूत्र पिणे नाही. सत्यनारायण करणे नाही. आंबेडकरवादी होणे म्हणजे खरे बोलणे होय असे खरात यांनी सांगितले.


आरएसएसला आव्हान देण्याचे काम बुद्धीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून केले जाणार आहे. बुद्धीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच आव्हान देऊ शकते. दुश्मन किती घाबरला आहे त्याचे उदाहरण देताना १९९१ मध्ये बाबासाहेबांचा जन्मशताब्दी वर्ष होता. त्यावेळी दत्ता ठेंगडी या नागपूरच्या ब्राम्हणाने २६ ऑक्टोबर १९९० रोजी वामनराव गोडबोले यांना एक पत्र लिहले होते. दत्ता ठेंगडीने त्या पत्रात म्हटले होते की, मी सरसंघचालकांसमोर भाषण करणार आहे. त्या भाषणात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केले ते किती चांगले आहे याबाबत त्यांना सांगणार आहे. त्यामुळे तुमच्याकडून मला माहिती हवी आहे. कारण तुम्ही बाबासाहेबांबरोबर राहिला आहात. बाबासाहेबांचे नेटवर्क किती पसरले याची मला माहिती हवी आहे. बाबासाहेबांच्या समर्थनात देश-विदेशातील कोणकोणते भिक्खू होते, कुठले प्रधानमंत्री होते, राष्ट्रपती होते याची इत्यंभूत माहिती मला हवी. मला सरसंघचालकांसमोर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतरासंदर्भात भाषण करायचे आहे, त्यासाठी माहिती हवी आहे, आरएसएसचे लोक वामनराव गोडबोले यांच्याकडे माहिती मागत होते. मात्र गोडबोले खरे आंबेडकरवादी होते त्यांनी माहिती दिली नाही. गोडबोले यांच्या निधनानंतर पंडीत शर्मा यांना आर.एस.गवई यांनी दीक्षाभूमीचे सदस्य बनवले आणि दीक्षाभूमीवर ब्राम्हणांचा कब्जा करण्यात आला असे खरात यांनी स्पष्ट केले.PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Hereसंपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सार्वजनिक सेवेचे ब्राम्हणीकरण म्हणजेच भांडवलीकरण
शोषितांचा आणि शोषकांचा धर्म एक कसा?
१३ कोटींचा पेपर प्रिंटिंग कंपनीकडे ना प्रिंटिंग मशीन, ना
शेतकरी आंदोलन: गुन्हे मागे घेईपर्यंत घरी परतणार नाही
पशूंवरील अत्याचाराचे ३३८ खटले
ओबीसींची जातनिहाय जनगणना न केल्यास देशव्यापी आंदोलन कर
छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारा विदेशी ब्राम्ह
राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना अब
एसटीच्या संपकरी कर्मचार्‍यांवर उगारणार ‘मेस्मा’चा बडग
राज ठाकरेंचा ‘जय श्रीराम’ चा नारा ब्राम्हणवादाच्या मजब
परमबीर सिंगांच्या अडचणीत वाढ
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापी
जातिनिहाय जनगणना नाहीच
राजकीय पक्षांना मिळाला १ हजार १०० कोटी रुपयांचा फंड
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य प्रकाशित करण्याबाबत म
२०२० मध्ये युएपीए अंतर्गत १ हजार ३२१ लोकांना अटक
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी श्रद्धांजली अर्प
देशात गेल्या तीन वर्षांत दरडोई उत्पन्नात फक्त तीन हजारा
परमबीर सिंग अखेर निलंबित
एसटीचे ९ हजार कर्मचारी निलंबित
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper