×

राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चाच्या जेलभरोने शासक वर्गाला फुटला घाम

Published On :    25 Nov 2021  By : MN Staff
शेयर करा:


चौथ्या टप्प्यातील आंदोलनाला देशभरात उदंड प्रतिसाद





नवी दिल्ली: ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी, तीन काळे कृषी कायद्यांच्याविरोधात, ईव्हीएमच्या विरेेधात, खासगी क्षेत्रातही आरक्षण लागू करण्यासाठी, जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत, एनआरसी व सीएएविरोधात आज देशभरातील चौथ्या टप्प्यातील आंदोलनाला उदंड प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चाच्या जेलभरोने शासक वर्गाला घाम फुटला आहे. देशातील ओबीसी जागृत होत असल्याने शासक वर्गाच्या पायाखालची वाळू सरकली आहे.


राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चाने देशभरात आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल यांनी केले आहे. हे आंदोलन पाच टप्प्यात घोषित करण्यात आले होते. आजचा चौथा टप्पा होता. 


चौथ्या टप्प्यात रॅली प्रदर्शन व जेलभरो आंदोलन करण्यात आले आहे. देशातील नवी दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, बिहार, राजस्थान, पश्‍चिम बंगाल, आसाम, ओडीशा, गुजरात, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा या प्रमुख राज्यात राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चाने जेलभरो आंदोलन केले. या जेलभरो आंदोलनाला देशभरात मोठा प्रतिसाद लाभला.


केंद्रातील भाजपा सरकारने तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली असली तरी राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चाचा १० डिसेंबरचा भारत बंद होणारच आहे. कारण ओबीसींच्या जातनिहाय जनगणेबाबत केंद्र सरकारने अद्यापही काही पावले उचललेली नाहीत. उलट ओबीसींच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम केले जात आहे. 


देशातील ओबीसी हा जागृत होत असल्याने तो आपल्या मागण्यांबाबत ठाम आहे. त्यामुळे आंदोलन करायचाच या निर्धाराने तो मैदानात उतरला आहे. त्यासाठीच देशभरात आज आंदोलनाचे वारे घुमत आहेत. त्याचीच शासक वर्गाला भीती वाटत आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही अशी घोषणा राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल यांनी केली आहे. त्यामुळे आगामी कालखंडात केंद्र सरकार काय निर्णय घेते याकडे सार्‍या देशवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सार्वजनिक सेवेचे ब्राम्हणीकरण म्हणजेच भांडवलीकरण
शोषितांचा आणि शोषकांचा धर्म एक कसा?
१३ कोटींचा पेपर प्रिंटिंग कंपनीकडे ना प्रिंटिंग मशीन, ना
शेतकरी आंदोलन: गुन्हे मागे घेईपर्यंत घरी परतणार नाही
पशूंवरील अत्याचाराचे ३३८ खटले
ओबीसींची जातनिहाय जनगणना न केल्यास देशव्यापी आंदोलन कर
छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारा विदेशी ब्राम्ह
भाजपा सरकारच्या बेगडी राष्ट्रवादाचा बुरखा निती आयोगाने
८० हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा कॅगचा ठपका
नागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू
राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना अब
एसटीच्या संपकरी कर्मचार्‍यांवर उगारणार ‘मेस्मा’चा बडग
राज ठाकरेंचा ‘जय श्रीराम’ चा नारा ब्राम्हणवादाच्या मजब
परमबीर सिंगांच्या अडचणीत वाढ
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापी
जातिनिहाय जनगणना नाहीच
राजकीय पक्षांना मिळाला १ हजार १०० कोटी रुपयांचा फंड
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य प्रकाशित करण्याबाबत म
२०२० मध्ये युएपीए अंतर्गत १ हजार ३२१ लोकांना अटक
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी श्रद्धांजली अर्प
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper