×

रुपयाचा २० महिन्यांचा नीचांक, ४८ आशियन देशांतील चलनांच्या तुलनेत रुपयात सर्वाधिक घसरण

Published On :    22 Dec 2021  By : MN Staff
शेयर करा:


५ ट्रिलीयन डॉलरपर्यंत अर्थव्यवस्था नेण्याचा केंद्रातील भाजपा सरकारचा ढोल फुटला





नवी दिल्ली: भारतीय रुपया मंगळवारी किंचित मजबूत झाला असला तरी तो चालू तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) २.१२ टक्के कमकुवत झाला आहे. ही बाब खूप चिंताजनक आहे. कारण या कालावधीत चलनात इतकी मोठी घसरण आशियातील इतर ४७ देशांत कुठेही झालेली नाही. यामागील कारण कोरोना नव्हे तर परकीय गुंतवणूकदारांकडून भारतीय बाजारातून सातत्याने गुंतवणूक काढून घेणे हे आहे. 


परकीय गुंतवणूकदारांनी या तिमाहीत आजवर भारतीय बाजारातून तब्बल ३४ हजार कोटी रुपयांचा उपसा केलेला आहे. दरम्यान याच केंद्रातील भाजपा सरकारने ५ ट्रिलीयन डॉलरपर्यंत अर्थव्यवस्था नेण्याचा ढोल बडवला होता तो आता फुटला असून बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात अशी अवस्था झाली आहे.


मंगळवारी १ अमेरिकी डॉलरचे मूल्य ७५.५७ रु. होते. ही गेल्या २० महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळी आहे. बर्‍याच काळापासून रुपया ७५ रुपयांच्या वरच आहे. क्वांटआर्ट मार्केट सोल्युशन्सच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, रुपयातील घसरणीच्या ट्रेंडकडे बघता पुढील तिमाहीपर्यंत (मार्च २०२२) डॉलरचे मूल्य सातत्याने चढे राहू शकते. वित्तवर्ष २०२१-२२ रुपयातील घसरणीचे सलग चौथे वर्ष ठरू शकते. यामुळे भारतात येणार्‍या सर्व परकीय वस्तू सातत्याने महाग होत चालल्या आहेत.


रुपयातील घसरणीची ४ कारणे पुढे आली आहेत.परकीय गुंतवणूकदार भारतातून पैसे काढत असल्याने डॉलरचा पुरवठा बाधित झाला आहे. अमेरिकेने व्याजदर ०.७५ टक्के वाढवण्याचे संकेत दिले. यामुळे डॉलर मजबूत झाला. रुपयावरील दबाव घटवण्यासाठी सध्या आरबीआय डॉलर विकत नाही. जोखीम घटवण्यासाठी सोन्याप्रमाणे डॉलर गोळा करण्याची पद्धत आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
ओबीसींची दशा आणि दिशा
२०१९ मध्ये नरेंद्र मोदींच्या शपथविधीवर ७३ लाखांचा खर्च
ओबीसी आरक्षण: इम्पिरिकल डेटाबाबत २४ जानेवारीला मुख्यमं
हिंदू धर्म अस्तित्वात नसतानाही तथाकथित हिंदू धर्माच्या
देशातील उपासमारीची जुनी आकडेवारी सादर
तब्बल ५ कोटींपेक्षा अधिक लोकांवर बेरोजगार
वेगवान आर्थिक विकासासाठी धोरण बदलण्याची गरज
मागासवर्गीय आयोगाला ओबीसींचा डेटा सोपवा
कोरोना लसीच्या सक्तीविरोधात आंदोलनाची घोषणा होताच केंद
जनमत विरोधात असल्याने भाजपाला आठवले राम मंदिर आणि साड्य
संघर्षाचा त्रिकोण, सरकार,पोलीस आणि नागरिक
उत्तर प्रदेशात लोकांचा उद्रेक
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये २७ टक्के ओबीसी आ
२४ जानेवारीपासून पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु होण
भाजप नेत्याला कौटुंबिक हिंसाचार भोवला
एसटी संपामुळे घरात पैसे नाहीत, एसटी कर्मचार्‍याच्या मुल
आरोग्य कर्मचार्‍याची नावाड्यावर लसीकरणाची सक्ती
समतेचे आंदोलन करणारे संत भगवानबाबा
आर्थिक विषमतेला ‘विकासाची भरजरी वस्त्रे’ चढवून झाकण्या
गोव्यातील २३ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper