×

सक्तीच्या लसीकरणाविरोधात बहुजन मुक्ती पार्टी मैदानात

Published On :    6 Jan 2022  By : MN Staff
शेयर करा:


सरकारला सर्वसामान्यांच्या जीवाची एवढी काळजी कशी काय? लोकांचा सवाल, तिसर्‍या टप्प्यात राष्ट्रपती, प्रधानमंत्री, सरन्यायाधीश, लोकसभा अध्यक्षांना मेल पाठवून सक्तीचे लसीकरण थांबवण्याची मागणी





पुणे: देशात अनेक आजार आहेत. त्या आजारांविरोधात कधी सरकारने जागृती सोडाच लसीकरणही केले नाही. एवढे बेफिकीर असणारे केंद्र  व राज्य सरकार मात्र कोविडच्या लसीकरणाची सक्ती करताना दिसत आहे. या सक्तीच्या लसीकरणाविरोधात बहुजन मुक्ती पार्टी मैदानात उतरली असून तिसर्‍या टप्प्यात राष्ट्रपती, प्रधानमंत्री, सरन्यायाधीश, लोकसभा अध्यक्षांना मेल पाठवून सक्तीचे लसीकरण थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. तशाप्रकारचे मेल पाठवण्यात यावेत असे आवाहन बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्रीकांत होवाळ यांनी केले आहे. दरम्यान सक्तीच्या लसीकरणामागे सरकारचे गौडबंगाल तर नाही ना अशी शंका लोकांमध्ये विचारली जात आहे.


बहुजन मुक्ती पार्टीच्यावतीने कोविड लसीकरणाच्या सक्तीविरोधात पाच टप्प्यात आंदोलन पुकारण्यात आले आहे. दि.६ डिसेंबरला याचा पहिला टप्पा पूर्ण झाला. २० डिसेंबरला महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन व निवेदन देण्यात आले. ३ ते १२ जानेवारी या कालखंडात तिसर्‍या टप्प्यात देशातील महत्वाची व्यक्ती राष्ट्रपती, प्रधानमंत्री, सरन्यायाधीश, लोकसभा अध्यक्षांना मेल पाठवून सक्तीचे लसीकरण थांबवण्याची मागणी करण्यात येत आहे.


सक्तीचे लसीकरण म्हणजे लोकांच्या मौलिक अधिकाराचे हनन आहे. संविधान कलम क्र.२१ नुसार प्रत्येक नागरिकाच्या जीविताचे संरक्षण करणे सरकारचे काम आहे. जीविताचे संरक्षण हा प्रत्येक नागरिकाचा मौलिक अधिकार आहे. असे असताना केंद्र अथवा राज्य सरकारांकडून कोविडच्या लसीची सक्ती केली जात आहे. सक्ती करत असताना त्या लसीमध्ये कुठले घटक टाकण्यात आले आहेत याची माहितीही सरकारच्यावतीने दिली जात नाही. त्यामुळे काहीतरी नक्कीच गौडबंगाल आहे. हा कार्यक्रम वर्ल्ड ऑर्डरनुसार राबवला जात नाही ना...अशी शंका लोकांकडून उपस्थित केली जात आहे. त्यामुळे हे कोविडचे सक्तीचे लसीकरण थांबवण्यात यावेत अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीने केली आहे. सक्तीच्या लसीकरणाविरोधात आंदोलन करणारी देशभरात बहुजन मुक्ती पार्टी एकमेव पक्ष आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
ओबीसींची दशा आणि दिशा
२०१९ मध्ये नरेंद्र मोदींच्या शपथविधीवर ७३ लाखांचा खर्च
ओबीसी आरक्षण: इम्पिरिकल डेटाबाबत २४ जानेवारीला मुख्यमं
हिंदू धर्म अस्तित्वात नसतानाही तथाकथित हिंदू धर्माच्या
देशातील उपासमारीची जुनी आकडेवारी सादर
तब्बल ५ कोटींपेक्षा अधिक लोकांवर बेरोजगार
वेगवान आर्थिक विकासासाठी धोरण बदलण्याची गरज
मागासवर्गीय आयोगाला ओबीसींचा डेटा सोपवा
कोरोना लसीच्या सक्तीविरोधात आंदोलनाची घोषणा होताच केंद
जनमत विरोधात असल्याने भाजपाला आठवले राम मंदिर आणि साड्य
संघर्षाचा त्रिकोण, सरकार,पोलीस आणि नागरिक
उत्तर प्रदेशात लोकांचा उद्रेक
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये २७ टक्के ओबीसी आ
२४ जानेवारीपासून पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु होण
भाजप नेत्याला कौटुंबिक हिंसाचार भोवला
एसटी संपामुळे घरात पैसे नाहीत, एसटी कर्मचार्‍याच्या मुल
आरोग्य कर्मचार्‍याची नावाड्यावर लसीकरणाची सक्ती
समतेचे आंदोलन करणारे संत भगवानबाबा
आर्थिक विषमतेला ‘विकासाची भरजरी वस्त्रे’ चढवून झाकण्या
गोव्यातील २३ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper