×

माझा जीव धोक्यात होता अशाप्रकारे मोदींच्या स्टंटने लोकांमध्ये संताप

Published On :    7 Jan 2022  By : MN Staff
शेयर करा:


सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीतून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न, फेकू मोदींसाठी महामृत्युंजय जप करत भाजपाकडून बौद्धीक दिवाळखोरी





नवी दिल्ली: देशाचे प्रधानमंत्रीपद स्विकारल्यापासून नरेंद्र मोदी यांचा स्टंट करण्यात कुणीही हात धरू शकणार नाही. असाच एक स्टंट मोदींनी केला असून सुरक्षा व्यवस्थेच्या त्रुटीववर त्यांनी बोट ठेवले आहे. माझा जीव धोक्यात होता, परंतु मी परत आलो अशी फेकामफेक करणार्‍या मोदींसाठी भाजपाने महामृत्युंजय जप करत बौद्धीक दिवाळखोरी दाखवून दिली आहे. माझा जीव धोक्यात होता असे सांगून त्यांनी लोकांची सहानुभूती मिळवण्याचा बळेबळे प्रयत्न केल्याची चर्चा देशभरात सुरू आहे.


पंजाबमधील फिरोजपूर येथे मोदींची रॅली होती. त्यासाठी ७० हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु तेथे केवळ ७०० लोकच हजर होते. त्यामुळे आपली नाचक्की होणार या भीतीपोटी मोदी यांनी सुरक्षा व्यवस्थेवर खापर फोडले असावे. माझ्या जीवाला धोका होता परंतु त्यातून मी सुखरूप आलो अशाप्रकारची फेकामफेक करत मोदी यांनी लोकांची सहानुभूती मिळवण्याचा बळेबळे प्रयत्न केला आहे. 


प्रधानमंत्र्यांची सुरक्षा एवढी कडेकोट असताना त्याच्यात त्रुटी कशी काय राहू शकते.  एवढेच कशाला त्यांची गाडीही बुलेटप्रुफ असते. बॉम्बस्फोट झाला तरी त्या गाडीला काहीच होत नाही. अनेक ब्लॅक कॅट कमांडोज सुरक्षेसाठी तैनात असतात. कडक सुरक्षा व्यवस्था असताना त्यांच्यावरच खापर फोडणे हे कितपत योग्य आहे. मात्र मोदींकडून काहीही केले जाऊ शकते हे अनेकदा समोर आल्याने त्यांनी आताही फेकामफेक  करण्याचा प्रयत्न केला.


पंजाबमधील भटिंडाहून फिरोजपूर येथे जाताना पुलावर आंदोलकांनी बुधवारी ताफा रोखल्याने मोदी १५-२० मिनिटे अडकून पडले होते. पंजाब पोलिसांकडून प्रधानमंत्र्यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याने मोदींचा ताफा पुन्हा भटिंडा विमानतळावर परतल्याचा आरोप केंद्राने केला़  मोदींना शारीरिक इजा करण्याचे कॉंग्रेसचे कारस्थान असल्याचा आरोप भाजपने केला असला तरी, मोदींच्या जीवाला धोका नव्हता व सुरक्षेतही त्रुटी नव्हती, असा दावा पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांनी केला आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
ओबीसींची दशा आणि दिशा
२०१९ मध्ये नरेंद्र मोदींच्या शपथविधीवर ७३ लाखांचा खर्च
ओबीसी आरक्षण: इम्पिरिकल डेटाबाबत २४ जानेवारीला मुख्यमं
हिंदू धर्म अस्तित्वात नसतानाही तथाकथित हिंदू धर्माच्या
देशातील उपासमारीची जुनी आकडेवारी सादर
तब्बल ५ कोटींपेक्षा अधिक लोकांवर बेरोजगार
वेगवान आर्थिक विकासासाठी धोरण बदलण्याची गरज
मागासवर्गीय आयोगाला ओबीसींचा डेटा सोपवा
कोरोना लसीच्या सक्तीविरोधात आंदोलनाची घोषणा होताच केंद
जनमत विरोधात असल्याने भाजपाला आठवले राम मंदिर आणि साड्य
संघर्षाचा त्रिकोण, सरकार,पोलीस आणि नागरिक
उत्तर प्रदेशात लोकांचा उद्रेक
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये २७ टक्के ओबीसी आ
२४ जानेवारीपासून पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु होण
भाजप नेत्याला कौटुंबिक हिंसाचार भोवला
एसटी संपामुळे घरात पैसे नाहीत, एसटी कर्मचार्‍याच्या मुल
आरोग्य कर्मचार्‍याची नावाड्यावर लसीकरणाची सक्ती
समतेचे आंदोलन करणारे संत भगवानबाबा
आर्थिक विषमतेला ‘विकासाची भरजरी वस्त्रे’ चढवून झाकण्या
गोव्यातील २३ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper