×

गेल्या सहा वर्षात ९ लाख लोकांनी सोडले भारतीय नागरिकत्व

Published On :    10 May 2022  By : MN Staff
शेयर करा:


दररोज ३५० लोक सोडतात भारतीय नागरिकत्व, गरीबी आणि बेरोजगारीने त्रस्त, कोट्यधीश लोकांनीही गाशा गुंडाळला





नवी दिल्ली:  दररोज ३५० लोक भारतीय नागरिकत्व सोडत असून गेल्या सहा वर्षात ९ लाख लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडून दिले आहे. त्यांनी दुसर्‍याचे देशाचे नागरिकत्व स्विकारले आहे. केवळ गरीबी आणि बेरोजगारीने त्रस्त असलेल्या लोकांनीच नव्हे तर कोट्यधीश लोकही देशातून गाशा गुंडाळत आहेत. परराष्ट्र मंत्रालयाची आकडेवारी समोर आली आहे.


परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, एकूण १ कोटी ३३ लाख ८३ हजार ७१८ भारतीय नागरिक सध्या परदेशात राहत आहेत. ज्या लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडले आहे ते १०६ हून अधिक देशांचे नागरिक बनले आहेत. या दरम्यान सहा हजारांहून अधिक लोकांना भारतीय नागरिकत्व मिळाले आहे. २०१९ मध्ये सर्वाधिक १.४४ लाख लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडले. 


हे पण वाचा: यंदा ऑनलाईन जनगणना: ओबीसींची जातनिहाय जनगणना होणार का? की पुन्हा पाने पुसणार


लोकांनी वैयक्तिक कारणांमुळे भारतीय नागरिकत्व सोडले आहे. २०१६ ते २०२१ दरम्यान, एकूण ७ लाख ४९ हजार ७६५ भारतीयांनी त्यांचे भारतीय नागरिकत्व सोडले, ज्यात सर्वाधिक २०१९ मध्ये १.४४ लाखांनी भारतीय नागरिकत्व सोडले. याआधी २०१६ मध्ये १.४१ लाख लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडले होते.


हे पण वाचा: सांगा कुठयं महागाई?-माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केंद्र सरकारसमोर लोळण घेत गरीबांच्या जखमेवर चोळले मीठ



मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०१७ पासून, ६.०८ लाख भारतीयांनी परदेशी नागरिकत्व मिळविण्यासाठी त्यांचे नागरिकत्व सोडले आहे. २०१७ पासून देश सोडून गेलेले बहुसंख्य भारतीय यूएस, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये गेले. २०१७ पासून भारतीय नागरिकत्व सोडणार्‍यांपैकी ८२ टक्के लोकांनी या चार देशांचे नागरिकत्व घेतले आहे.२०१९ मध्ये, जेव्हा मोठ्या संख्येने भारतीयांनी त्यांचे नागरिकत्व सोडले, तेव्हा ८५ टक्के लोक या चार देशांमध्ये गेले. 


हे पण वाचा: कर्नाटकात ब्राम्हणवादी श्री राम सेनेचे आता लाऊडस्पीकरविरोधी आंदोलन


२०१७ पासून, किमान २.५६ लाख भारतीयांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्विकारले आहे, तर ९१ हजाराहून अधिक लोकांनी कॅनडामध्ये स्थलांतर केले आहे. किमान ३१ भारतीयांनी २०२० मध्ये ७ आणि २०२१ मध्ये २४, पाकिस्तानसाठी भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला. २०१७ ते २०२१ या कालावधीत २ हजार १७४ भारतीय नागरिकत्व सोडून चीनमध्ये गेले. त्या काळात ९४ भारतीय श्रीलंकेत स्थायिक झाले. नेपाळने १३४ भारतीयांना नागरिकत्व देऊ केले आहे.


दुसरीकडे, गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, २०१६ ते २०२१ दरम्यान एकूण ५ हजार ८९१ परदेशी लोकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले. २०१८ ते २०२१ दरम्यान, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील हिंदू, शीख, जैन आणि ख्रिश्चन अल्पसंख्याक गटांकडून किमान ८ हजार २४४ नागरिकत्व अर्ज प्राप्त झाले आहेत.


२०१८ पासून पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील एकूण ३ हजार ११७ हिंदू, शीख, जैन आणि ख्रिश्चन अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. डिसेंबर २०२१ पर्यंत, १० हजार ६३५ भारतीय नागरिकत्व अर्ज प्रलंबित होते, त्यात पाकिस्तानचे ७ हजार ३०६ आणि अफगाणिस्तानमधील १ हजार १५२ अर्ज होते.


भारतातील करोडपती आणि अब्जाधीशांची संख्याही मोठी आहे ज्यांनी देशाचे नागरिकत्व सोडले आहे. मॉर्गन स्टॅनले बँकेने २०१८ मध्ये काही आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार २०१४-१८ दरम्यान २३ हजार भारतीय करोडपतींनी देश सोडला. ग्लोबल वेल्थ मायग्रेशन रिव्ह्यूच्या अहवालात असे आढळून आले आहे की सुमारे ५ हजार भारतीय करोडपती एकट्या २०२० मध्ये भारत सोडून परदेशात गेले.


इतर देशांना नागरिकत्व आणि व्हिसा उपलब्ध करून देणारी यूकेस्थित आंतरराष्ट्रीय कंपनी हेन्ली अँड पार्टनर्स म्हणते की, गोल्डन व्हिसाद्वारे एखाद्या देशाचे नागरिकत्व मिळवणार्‍या भारतीयांची संख्या म्हणजे गुंतवणूक वेगाने वाढत आहे. हेन्ली ग्लोबल सिटिझन्सच्या अहवालानुसार, २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये नागरिकत्वाच्या नियमांची चौकशी करणार्‍या भारतीयांच्या संख्येत ५४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सन २०२० मध्ये देखील २०१९ च्या तुलनेत या संख्येत ६३ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
२५ मे भारत बंदला रोखण्यासाठी ब्राम्हणवाद्यांकडून हनुमा
कोरोना काळात जगात दर ३० तासांनी एका अब्जाधीशाचा उदय, तर द
बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेबाबत २७ मे रोजी सर्वपक्षीय ब
अनधिकृत शाळांचे फुटले पेव
ज्ञानवापीमध्ये शिवलिंग नाही, मुस्लिमांना केले जातेय टा
यूएपीएची तरतूद देशद्रोहापेक्षा धोकादायक
मध्य प्रदेशात २९ आणि राजस्थानमध्ये दररोज १४ मुले हरवतात
टुकार अभिनेत्री केतकी चितळेच्या जामीन अर्जावर २६ तारखे
ज्ञानव्यापी मशीद ब्राम्हणांचे नसून बुद्धीस्ट स्थळ
ज्ञानवापी मस्जिद आणि शिवलिंग या प्रकरणात 1991चा चा प्रार्थ
ज्ञानवापी मशीद प्रकरणावर वाराणसी न्यायालयाचा आदेश बेका
कर्नाटकच्या भाजप सरकारने शिक्षणात शालेय मंडळांमधील दहा
कोरोना आजाराच्या प्रारंभानंतर ज्येष्ठ नागरिकांना तिकी
ज्ञानवापी प्रकरणात हिंदू एनजीओ पदाधिकाऱ्याला सर्वोच्च
तथागत गौतम बुध्दांची विचारसरणी आजही जगाला मार्गदर्शकच
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजे यांना
शहरातील केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कार्यालयांकडे
बाबरी मस्जिद गमावली पण आता ज्ञानवापी मस्जिद गमावणार ना
महाराष्ट्र सरकारकडून राजभवनला देण्यात येणाऱ्या निधीत व
अत्त दीप भव: तथागत बुद्धांचा विचारच महत्वाचा
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper