×

नव्या शैक्षणिक धोरणात शालेय अभ्यासक्रम बदलण्यासाठी २४ लोक आरएसएसशी संबंधित

Published On :    21 Jun 2022  By : MN Staff
शेयर करा:


शिक्षणाच्या ब्राम्हणीकरणासाठी केंद्रातील भाजपा सरकार पुढे सरसावले, देशाचा खराखुरा इतिहास दाबला जाणार, पाखंडपणाला मिळणार वाव





नवी दिल्ली: शिक्षणाच्या ब्राम्हणीकरणासाठी केंद्रातील भाजपा सरकार पुढे सरसावले असून नव्या शैक्षणिक धोरणात शालेय अभ्यासक्रम बदलण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे. अभ्यासक्रम बदलण्यासाठी २४ लोक आरएसएसशी संबंधित आहेत. त्यामुळे देशाचा खराखुरा इतिहास दाबला जाणार असून पांखडपणाला वाव मिळणार आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात ढलकण्याचे काम  सुरू करण्यात आले आहे.


देशात २०२० मध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करण्यात आले होते. त्यावेळी कुठल्याही प्रकारचे राजकारण करण्यात आले नव्हते. मतभेदही समोर आले नव्हते. मात्र आता केंद्रातील भाजपा सरकारच्या माध्यमातून शिक्षणाच्या ब्राम्हणीकरणाचा घाट घालण्यात आला आहे. या क्रमाने, विद्यापीठांमध्ये चार वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा लागू करण्यात आली आहे. 


नव्या शैक्षणिक धोरणानुसार शाळांच्या अभ्यासक्रमात बदल केले जाणार आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकारण दिसत आहे. २०१४ ला केंद्रात भाजपा सरकार आल्यानंतर हा बदल केला जात आहे. तर तथाकथित स्वातंत्र्यानंतर पाचवेळा असा बदल करण्यात आला आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने केलेल्या तपासणीत असे आढळून आले की, अभ्यासक्रम बदलण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर लक्ष केंद्रित केलेल्या २५ एनसीएफ गटांपैकी किमान १७ गट आरएसएसशी संबंधित लोकांचा समावेश आहे. स्वदेशी जागरण मंचच्या राष्ट्रीय सहसंयोजकापासून ते विद्या भारतीच्या प्रमुखापर्यंत २४ सदस्य आरएसएसशी संबंधित आहेत.


हे पण वाचा: आरएसएस देशाच्या राजकारणाची दिशा ठरवतो



यापूर्वी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने केलेल्या तीन दिवसांच्या तपासात गुजरात दंगल, जातिव्यवस्था, मुस्लिम राज्यकर्ते यांच्याशी संबंधित काही प्रकरणे अभ्यासक्रमातून वगळण्यात आल्याचे आढळून आले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नियुक्त केलेल्या इस्त्रोचे माजी अध्यक्ष के.कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील १२ सदस्यीय सुकाणू समितीच्या नेतृत्वाखाली अभ्यासक्रमाची सुधारणा केली जात आहे. 


कस्तुरीरंगन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, एनसीएफशी संबंधित कोणत्याही विषयावर मी भाष्य करणार नाही. समितीच्या एका ज्येष्ठ सदस्याने सांगितले की, आम्ही आम्हाला दिलेल्या कामाला पूर्ण न्याय देऊ आणि गोष्टी निष्पक्षपणे मांडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू.आम्ही तुम्हाला सांगतो की सुधारित एनसीएफ नवीन एनसीईआरटी पुस्तकांचा पाया म्हणून काम करेल आणि एनसीएफ गटांनी तयार केलेल्या पेपरवर आधारित अभ्यासक्रम बदलला जाईल. प्रत्येक एनसीएफ गटात ७-१० सदस्य असतात.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
प्रबोधनकार ठाकरेंचा वैचारिक वारसा आणि महाराष्ट्राचे रा
आता दहावीनंतर पुढे काय? पाल्यांचा कल ओळखून करिअर क्षेत्र
मुख्यमंत्रीपद देण्यामागे शिवसेना संपवण्यासाठी बंदुकी
एकनाथ शिंदेंना काय म्हणून सरकार स्थापन करण्यासाठी बोला
मैदानातील माणूस माझ्यासोबत असल्याने तुम्हांला रस्त्या
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ६ ऑगस्ट रोजी
आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे १५१ जणांनी गमावला जीव
मोहम्मद पैगंबरांवरील तुमच्या वक्तव्याने देशाची बदनामी,
खासदारांच्या रेल्वेतील फुकट प्रवासासाठी केंद्राकडून ५
धर्माच्या आधारावर देशाची विभागणी करणे चुकीचे
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लंडन सर्वोत्तम शहर, मुंब
३.५९ कोटी ग्राहकांनी वर्षभरात एकही सिलिंडर भरला नाही
३१ टक्के राज्यसभा खासदारांवर फौजदारी खटले
दिल्लीतील १२ महाविद्यालयांची आर्थिक कोंडी
तब्बल ४ वेळा बंडखोरीची लागलेली चाहूल
५४ टक्के भारतीयांचा सोशल मीडियावर विश्‍वास
लोकविरोधाच्या धास्तीने पेशवा फडणवीस मुख्यमंत्रीपदापा
टरबुजाने बंडखोर आमदारांवर खर्च केले ७ हजार कोटी
भाजपाकडून घटनाविरोधी काम
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीपासून मातंग बांधवांना
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper