×

एकनाथ शिंदेंना ३७ आमदार फोडावे लागतील नाहीतर पुन्हा ‘फसलेल्या बंडाची कहाणी...!’

Published On :    21 Jun 2022  By : MN Staff
शेयर करा:


दोन तृतीयांश आमदार दुसर्‍या पक्षात गेले, तर पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही





मुंबई: एकनाथ शिंदे यांच्यासोबत सध्या २० आमदार आहेत. आम्ही शिवसेनेतच आहोत. परंतु कॉंग्रेस, राष्ट्रवादीसोबतच सरकार आम्हाला मान्य नाही, अशी त्यांची भूमिका आहे. अशावेळी ठाकरे सरकारमधून बाहेर पडून भाजपसोबत सरकार स्थापन केलं जावं, असा निरोप शिंदे समर्थकांनी शिवसेना नेतृत्वाला दिला आहे. परंतु हा निरोप जर शिवसेना नेतृत्वाने मान्य केला नाही एकनाथ शिंदे वेगळी भूमिका घेऊ शकतात.


अशावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत फक्त २० आमदार असून चालणार नाही तर शिंदेकडे आणखी १७ आमदार असणं आवश्यक आहे तरच ते पक्षांतर बंदीच्या कचाट्यातून वाचू शकतात. सध्या सेनेकडे ५५ आमदार आहेत. दोन तृतीयांश आमदार दुसर्‍या पक्षात गेले, तर पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. म्हणजेच सेनेच्या ३७ आमदारांनी काही वेगळा निर्णय घेतला तर त्यांच्याविरोधात पक्षांतर बंदीचा कायदा लागू होणार नाही.


हे पण वाचा: सत्तेच्या लोभापायी एकनाथ शिंदेनी ब्राम्हणासाठी अंथरल्या पायघड्या-फडणवीसांना मुख्यमंत्री आणि मला उपमुख्यमंत्री करा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शिदेंनी तीन प्रस्ताव दिल्याची चर्चा



पण जर एकनाथ शिंदे ३७ आमदार फोडू शकले नाहीत तर महाराष्ट्राला पुन्हा एकदा फसलेल्या बंडाची कहाणी बघायला मिळू शकते. २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जसं बंड केलं, पण आमदार सोबत नसल्याने अजित पवारांना एक पाऊल मागे घेऊन पुन्हा राष्ट्रवादीसोबत यावं लागलं, तसाच प्रकार एकनाथ शिंदेंबरोबरही घडतो का की शिंदे ३७ आमदार फोडण्यात यशस्वी होतात, याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
प्रबोधनकार ठाकरेंचा वैचारिक वारसा आणि महाराष्ट्राचे रा
आता दहावीनंतर पुढे काय? पाल्यांचा कल ओळखून करिअर क्षेत्र
मुख्यमंत्रीपद देण्यामागे शिवसेना संपवण्यासाठी बंदुकी
एकनाथ शिंदेंना काय म्हणून सरकार स्थापन करण्यासाठी बोला
मैदानातील माणूस माझ्यासोबत असल्याने तुम्हांला रस्त्या
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ६ ऑगस्ट रोजी
आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे १५१ जणांनी गमावला जीव
मोहम्मद पैगंबरांवरील तुमच्या वक्तव्याने देशाची बदनामी,
खासदारांच्या रेल्वेतील फुकट प्रवासासाठी केंद्राकडून ५
धर्माच्या आधारावर देशाची विभागणी करणे चुकीचे
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लंडन सर्वोत्तम शहर, मुंब
३.५९ कोटी ग्राहकांनी वर्षभरात एकही सिलिंडर भरला नाही
३१ टक्के राज्यसभा खासदारांवर फौजदारी खटले
दिल्लीतील १२ महाविद्यालयांची आर्थिक कोंडी
तब्बल ४ वेळा बंडखोरीची लागलेली चाहूल
५४ टक्के भारतीयांचा सोशल मीडियावर विश्‍वास
लोकविरोधाच्या धास्तीने पेशवा फडणवीस मुख्यमंत्रीपदापा
टरबुजाने बंडखोर आमदारांवर खर्च केले ७ हजार कोटी
भाजपाकडून घटनाविरोधी काम
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीपासून मातंग बांधवांना
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper