×

‘शेंडीने कापला गळा’

Published On :    23 Jun 2022  By : MN Staff
शेयर करा:


मुळात हिंदुत्व म्हणजे काय? हेच बहुजनांच्या लक्षात येत नाही हीच मोठी शोकांतिका आहे. ‘हिंदुत्व’म्हणजे दुसरे तिसरे काही नसून ते ‘ब्राम्हणत्व’ आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राम्हणांचे वर्चस्व राखण्याचा तो एककलमी कार्यक्रम आहे. उद्धव ठाकरे यांनी एकदा आपल्या भाषणात ‘शेंडी-जानव्याचे आमचे हिंदुत्व नाही’ असे सांगितले होते. याचा अर्थच त्यांनी शेंडी-जानव्याला नाकारले आहे. आता शेंडी कोण ठेवते व जानवे कोण घालते त्याचा विचार करा.





शिवसेनेचे नेते व महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत राज्य सरकारसमोर आव्हान निर्माण केले आहे. त्यातच जवळ-जवळ ४० आमदार माझ्यासोबत आहेत असा दावा त्यांनी केला आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडा आणि भाजपासोबत हातमिळवणी करून राज्यात नवीन सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करा अशी मागणी शिंदे व त्यांच्या समर्थक आमदारांची आहे. त्यामुळे राज्यातील सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाले की काय? अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.


एकनाथ शिंदे हे फडणवीस मंत्रीमडळातही मंत्री होते आणि आता उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळातही मंत्री आहेत. शिंदे हे मूळचे सातारा जिल्ह्याचे, परंतु त्यांची राजकीय कारकीर्द बहरली ती ठाण्यात. ते ठाण्यामध्ये रिक्षा चालक होते. रिक्षाचालक असलेले शिंदे कॅबिनेटपर्यंत पोहचले ते कशामुळे...! शिवसेना हे चार अक्षर पाठीमागे असल्यामुळेच ना...मी काही शिवसैनिक नाही, शिवसेनेची भलामण करायला. परंतु वस्तुस्थिती मांडली पाहिजे. म्हणजे ज्या घरट्याने आपल्याला सावरले तेच घरटे मोडायला निघालेले शिंदे....याला काय म्हणणार? 


मी हिंदुत्वासाठी काम करत आहे आणि महाविकास आघाडी ही नैसर्गिक आघाडी नाही त्यामुळे त्यातून तुम्ही बाहेर पडा अशी मागणी शिंदे व त्यांच्या समर्थकांची आहे. मुळात हिंदुत्व म्हणजे काय? हेच बहुजनांच्या लक्षात येत नाही हीच मोठी शोकांतिका आहे. ‘हिंदुत्व’म्हणजे दुसरे तिसरे काही नसून ते ‘ब्राम्हणत्व’ आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राम्हणांचे वर्चस्व राखण्याचा तो एककलमी कार्यक्रम आहे. उद्धव ठाकरे यांनी एकदा आपल्या भाषणात ‘शेंडी-जानव्याचे आमचे हिंदुत्व नाही’ असे सांगितले होते. याचा अर्थच त्यांनी शेंडी-जानव्याला नाकारले आहे. आता शेंडी कोण ठेवते व जानवे कोण घालते त्याचा विचार करा.


शिंदे यांच्या बंडामागे ईडीचाही कंगोरा आहे. तुम्ही तर रिक्षाचालक आहात एवढी संपत्ती कशी काय आली? तशी शिंदेना धमकी दिली गेली असावी अशी शक्यता आहे. त्याशिवाय लोटांगण कोणी घालू शकत नाही. देशात भाजपाच्या हातात सार्‍या यंत्रणा आहेत. कारण ते केंद्रात सत्तेवर आहेत. त्या सत्तेच्या माजातून त्यांनी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला आहे. जसे त्यांनी मध्यप्रदेशचे सरकार पाडले होते. त्याला नाव काय दिले जाते तर ‘ऑपरेशन लोटस.’ शिंदे यांचे बंड आपल्या पाठीमागे ईडी लागू नये म्हणूनही असू शकते. 


आपण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सहभागी झाले तर काहीच होणार नाही असा शिंदेचा होरा असू शकतो. म्हणून त्यांनी आघाडीतून बाहेर पडा अशी मागणी केली आहे. कारण जे लोक ईडीच्या भीतीने भाजपामध्ये गेले आहेत, त्यांना केंद्रीय यंत्रणाने हातच लावलेला नाही. त्यात कितीतरी नावे घेता येतील. एवढेच कशाला तत्कालीन कॉंग्रेस नेते व आता भाजपामध्ये असलेले हर्षवर्धन पाटील यांनी जाहीरपणे सांगितले होते की, मी आता भाजपामध्ये असल्याने मला ईडी हात लावणार नाही, याला काय म्हणणार?


शिंदे हे बंड केल्यापासून माझ्याकडे ४० आमदार असल्याचे सांगत आहेत. काय खरंच तेवढे आमदार त्यांच्याकडे आहेत का? की त्यांच्याकडून डॅमेज कंट्रोल करण्यात येत आहे. ४० आमदार असतील तर त्यांनी आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र तत्काळ राज्यपालांना सुपूर्द करून भाजपाबरोबर सत्ता स्थापण्यास काय अडचण आहे? कारण शिंदे गटाकडे किमान ३७ आमदार हवे आहेत, मग त्यांची आमदारकी शाबूत राहू शकते. त्यांच्याकडे ४० आमदार आहेत असे ते दावा करत आहेत, मग अडले कुठे? याचे उत्तर शिंदेंकडे आहे का?


अशाप्रकारे बंडखोरीमुळे शिवसेना नेते व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर सरकार वाचवावे की शिवसेना वाचवावी असा पेच निर्माण झाला आहे. मात्र ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा न देता त्यांनी विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे जायला हवे. सभागृहात विश्‍वासदर्शक ठराव हरल्यास त्यांनी राजीनामा द्यायला हवा, तोपर्यंत घाई करण्याची गरज नाही. कारण जे आमदार शिंदे यांच्याबरोबर आहेत, तेच आमदार उद्या ठाकरे यांच्या विश्‍वासदर्शक ठरावाच्या बाजूने मते देऊ शकतात. त्यामुळे केवळ शिंदे यांचेच नव्हे तर भाजपाचे मनसुबेदेखील उध्वस्त होऊ शकतात. 


कारण या बंडखोरीची लिंक पाहिली तर यामागे निश्‍चितच भाजपाचे लोक आहेत असे आपण म्हणू शकतो. शिंदे यांनी सुरूवातीला सुरत आणि आता गुहावटीमध्ये ठाण मांडले आहे. सुरत गुजरातमध्ये तर गुहावटी आसाममध्ये, दोन्ही राज्ये भाजपाची आहेत. त्या आमदारांचा पंचतारांकित हॉटेलमधील खर्च कोण करत आहे? याचाही केंद्रीय यंत्रणाने तपास करायला हवा, परंतु केंद्रीय यंत्रणा तपास करणार नाहीत, कारण त्या केंद्राच्या बटीक झाल्या आहेत.


उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हमध्ये आपल्याला सत्तेचा मोह नाही, बंडखोरातील एका आमदाराने जरी समोर येऊन सांगितले की, तुम्ही मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हा, तर क्षणाचाही विलंब न लावता राजीनामा देईन. त्याचबरोबर पक्षप्रमुखही पद मी सोडायला तयार आहे. परंतु त्यांनी समोर येऊन सांगायला हवे. त्यांनी बंडखोरांना व शिवसैनिकांना भावनिक आवाहन केले आहे. 


आज शिंदेसारखे लोक बंडखोरी करून आव्हान निर्माण करत असले तरी गेलेल्या आमदारांसोबत शिवसैनिक नाही, शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे. जर का विधानसभा बरखास्त झाली आणि त्यानंतर पोटनिवडणूक लागली तर जे बंडखोर आमदार आहेत त्यांना पुन्हा निवडून येणे शक्य नाही. कारण शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद आहे. ते बंडखोरांना धडा शिकवतात हा इतिहास आहे. अर्थात ईव्हीएम असल्यामुळे बंडखोरी केलेल्या आमदारांना निवडून आणले जाऊ शकते हेदेखील तिकेच खरे आहे.


आणखी एक महत्वाची अपडेट तर धक्कादायक आहे. फडणवीस हे सरकारला का पाडू इच्छित आहेत? कोरेगाव -भीमा दंगलीचा व या सरकार पडण्याचा निश्चित संबंध आहे, अशी पोस्ट ऍड. राहुल मखरे यांनी आपल्या फेसबुक पेजवर केली आहे. दंगलीचे आजपर्यंत कोणीही न पाहिलेले व्हिडीओ आयोगासमोर आम्ही दाखवत आहोत. दोन महिन्यांपूर्वी याची सुरुवात केली होती. 


या व्हिडीओमध्ये पोलिसांनी केलेल्या छेडछाडीवरून पोलीस स्वतःला म्हणजेच तत्कालीन गृहमंत्री फडणवीस यांना, भिडे-एकबोटेच्या दंगलखोर कार्यकर्त्यांना म्हणजेच भिडे-एकबोटेला वाचवण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. परंतु ते शक्य होणार नाही हे दिसल्यावर त्यांच्यासाठी सरकार पाडणे हा एकमेव पर्याय राहिला आहे. म्हणून सरकार पाडण्याचा खटाटोप सुरू आहे.


‘दगलबाज शिवाजी’ या पुस्तकात प्रबोधनकार ठाकरे लिहतात, ‘जो शुद्र ब्राम्हणावर विसंबून राहिला त्याचे राज्य खालसा झाले म्हणून समजा’. आज शिंदेची अवस्था काय आहे, ते ब्राम्हणावर विसंबून आहेत. म्हणजे शिंदे यांना स्वत:चे पक्षप्रमुख मुख्यमंत्री नको तर ब्राम्हण मुख्यमंत्री हवा आहे. त्या ब्राम्हणाने राज्य बुडवले तरी चालेल. राज्यात सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर शेवटी एवढेच म्हणू शकतो ‘शेंडीने कापला गळा’...!

दिलीप बाईत
९२७०९६२६९८



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
प्रबोधनकार ठाकरेंचा वैचारिक वारसा आणि महाराष्ट्राचे रा
आता दहावीनंतर पुढे काय? पाल्यांचा कल ओळखून करिअर क्षेत्र
मुख्यमंत्रीपद देण्यामागे शिवसेना संपवण्यासाठी बंदुकी
एकनाथ शिंदेंना काय म्हणून सरकार स्थापन करण्यासाठी बोला
मैदानातील माणूस माझ्यासोबत असल्याने तुम्हांला रस्त्या
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ६ ऑगस्ट रोजी
आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे १५१ जणांनी गमावला जीव
मोहम्मद पैगंबरांवरील तुमच्या वक्तव्याने देशाची बदनामी,
खासदारांच्या रेल्वेतील फुकट प्रवासासाठी केंद्राकडून ५
धर्माच्या आधारावर देशाची विभागणी करणे चुकीचे
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लंडन सर्वोत्तम शहर, मुंब
३.५९ कोटी ग्राहकांनी वर्षभरात एकही सिलिंडर भरला नाही
३१ टक्के राज्यसभा खासदारांवर फौजदारी खटले
दिल्लीतील १२ महाविद्यालयांची आर्थिक कोंडी
तब्बल ४ वेळा बंडखोरीची लागलेली चाहूल
५४ टक्के भारतीयांचा सोशल मीडियावर विश्‍वास
लोकविरोधाच्या धास्तीने पेशवा फडणवीस मुख्यमंत्रीपदापा
टरबुजाने बंडखोर आमदारांवर खर्च केले ७ हजार कोटी
भाजपाकडून घटनाविरोधी काम
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीपासून मातंग बांधवांना
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper