×

व्ही. एल. मातंग, कमलाकांत काळे, मनोजकुमार पासी यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार

Published On :    2 Aug 2022  By : MN Staff
शेयर करा:


इंडियन लीगल प्रोफेशनल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. राजकुमार थोरात यांचा इशारा, वामन मेश्राम, डॉ.विलास खरात यांचे पेगासॅस, भाजपा व आरएसएसच्या माध्यमातून फोन ट्रॅप





नवी दिल्ली: बामसेफ व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम, भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव डॉ.विलास खरात यांचे पेगासॅस, भाजपा व आरएसएसच्या माध्यमातून फोन ट्रॅप करण्यात येत आहेत. त्यासाठी व्ही. एल. मातंग, कमलाकांत काळे, मनोजकुमार पासी, हर्षित कुमार भाजपा-आरएसएसच्या इशार्‍यावर काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत असा इशारा इंडियन लीगल प्रोफेशनल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. राजकुमार थोरात यांनी दिला. त्यांनी एमएनटीव्हीशी संवाद साधताना हा इशारा दिला.

ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून बामसेफ व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव डॉ.विलास खरात यांचा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्यात आला. कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करून त्यांच्या वैयक्तिक अधिकाराचे हनन करण्यात आले. 


आम्ही जेव्हा माहिती काढली तेव्हा समजले की, पेगासॅस आणि भाजपा व आरएसएसच्या माध्यमातून मेश्राम व डॉ.खरात यांचा कॉल ट्रॅप केला जात आहे. या कॉल ट्रॅपबाबत आम्ही औरंगाबादमध्ये एफआयआर दाखल केला आहे. या एफआयआरच्या माध्यमातून पेगासॅसचा नवीन विषय हर्षितकुमार जो भाजपाच्या इशार्‍यावर काम करत आहे. कमलाकांत काले, मनोजकुमार पासी, व्ही.एल.मातंग यांच्याविरोधात आम्ही खटला दाखल करणार आहोत.


गुजरातमधील कच्छ गांधीधाममधील काही कार्यकर्त्यांनी आमच्याकडे लिखीत स्वरूपात तक्रार दिली आहे. कित्येक वर्षापासून सामूहिक विवाहाचे नारायण गरवा, व्ही.एल.मातंग व अन्य साथी आयोजन करत होते. या कार्यक्रमानंतर जो वाचलेला फंड आहे तो आम्ही बामसेफला जनआंदोलनासाठी देत आहोत असे त्यांच्याकडून सांगितले जात होते. आम्ही गेल्या अनेक वर्षापासूनचा रेकॉर्ड काढला तेव्हा अशाप्रकारचा फंड कच्छ गांधीधाममधून आलेला नसल्याचे दिसून आले. 


याची छाननी केली असताना या फंडचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला. त्या फंडच्या माध्यमातून नारायण गरवा, व्ही.एल.मातंग यांनी गुजरात व राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी जमीनी घेतल्या आहेत व रिअल इस्टेटचा धंदा सुरू केला आहे. याबाबत काही पुरावे गोळा करण्यासाठी  इंडियन लीगल प्रोफेशनल असोसिएशनच्या १० वकीलांवर आम्ही जबाबदारी सोपवली आहे. पाच वकील राजस्थानमध्ये व पाच वकील गुजरातमध्ये जाऊन तपास करतील. 


तपासानंतर संघटनेच्या नावावर जो भ्रष्टाचार करण्यात आला आहे, त्याबाबत क्रिमीनल केस दाखल करणार आहोत. संघटनेच्या नावाचा चुकीचा उपयोग करणे, संघटनेच्या प्रॉपर्टीवर कब्जा करण्याचा प्रयत्न करणे, संघटनेच्या पदाधिकार्‍यांची बदनामी करणे, त्यांचे चरित्र हनन करणे, सोशल मीडियावर चुकीची माहिती प्रसारित करणे याविरोधातही आम्ही न्यायालयात जाणार आहोत.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे राष्ट्रव्यापी आंदोलन
‘आरएसएस’ ही उच्च जातींची संघटना: राष्ट्रध्वज, राष्ट्रगी
महागाईच्या आगडोंबात सर्वसामान्य होरपळला
हळूहळू मित्रपक्षांना संपवायचे हीच भाजपाची रणनिती, निती
दहा जणांना आरटीआय दाखल करण्यास आजीवन बंदी
अशोक चक्र नसलेल्या ध्वजाचा वापर
अपात्रतेची सुनावणी असताना आमदारांना मंत्रिपदाची शपथ हा
भाजपा मजबूत झाल्यास मताचा अधिकार संपुष्टात
नितीश कुमारांनी आठव्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ,
निष्ठूरतेची परिसीमा: आधारकार्डअभावी ग्रामीण रुग्णालया
मुलभूत समस्यांकडे लक्ष्य विचलित करण्यासाठी घर-घर तिरंग
हिंदू-मुस्लीम दंगली व ब्राम्हण्यवादी
भारताचा डाटा सुरक्षेवर २४ हजार कोटी खर्च: तरीही सायबर गु
पाकिस्तानमध्ये पेट्रोलच्या दरात १० तर नेपाळमध्ये ११ रु
बिहारमध्ये ‘ऑपरेशन रिव्हर्स लोटस’
राज्यातील अपघातांत १८ टक्क्यांनी वाढ
वादग्रस्त संजय राठोड आणि अब्दुल सत्तार कॅबिनेटमंत्रीपद
वामन मेश्राम यांनी भारत व उत्तर प्रदेश बंदची घोषणा करताच
भटांची पिल्ले वैमानिक आणि आमची मंदिराच्या रांगेत
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची ६५४ केंद
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper