×

आता कर्नाटकमध्ये शाळांमध्ये शिकवणार भगवद्गीता

Published On :    21 Sep 2022  By : MN Staff
शेयर करा:


शिक्षणाच्या ब्राम्हणीकरणामुळे बहुजन विद्यार्थ्यांचा मेंदू गुलाम करण्याचा घाट





कर्नाटक: जगातील १०० विद्यापीठांमध्ये भारतातील एकही विद्यापीठ नाही. असे असतानाही नवीन शिक्षण प्रणाली लागू केल्यानंतर आरएसएसशासित राज्यांमध्ये रामायण, महाभारत, गीता, वेद, पुराणे शिकवण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे बहुजन समाजातील विद्यार्थ्यांचा मेंदू पुन्हा गुलाम बनवण्याचा घाट घातला गेला आहे. 


आता डिसेंबरपासून कर्नाटकातील शाळांमध्ये भगवद्गीता शिकवली जाणार असल्याने शिक्षणाच्या ब्राम्हणीकरणाने जोर पकडला आहे. सरकारने तयारी पूर्ण केली आहे. मात्र शाळांमध्ये धार्मिक पुस्तके शिकवण्यावरून वाद निर्माण झाला आहे.


दरम्यान, मुस्लिमांचे म्हणणे आहे की गीता शिकवली जात असेल तर कुराण का नाही, यावर   कुराण हा धार्मिक ग्रंथ आहे आणि भगवद्गीता हा धार्मिक ग्रंथ नाही असा कांगावा कर्नाटकचे शिक्षण मंत्री बीसी नागेश यांनी केला आहे. गीता कोणत्याही धार्मिक प्रथेबद्दल सांगत नाही. ती नैतिकतेबद्दल बोलते अशी चापलुसी करण्यात आली आहे. 


विधानपरिषदेत एका प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी असा कांगावा केला. भगवद्गीता हा स्वतंत्र विषय म्हणून शिकवण्याचा प्रस्ताव आम्ही मागे टाकला, परंतु नैतिक शिक्षणाचा भाग म्हणून त्यातील शिकवणी समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने यापूर्वीच तज्ज्ञांची समिती नेमली असून, विविध लोकांच्या सूचनांच्या आधारे डिसेंबरपासून वर्गात गीता शिकवली जाणार आहे. 


‘बाबा बुदनगिरी’सह पाठ्यपुस्तकांमधील चुका सुधारण्यासाठी सरकारने पावले उचलली असून त्याचे इनाम दत्तात्रेय पीठात रूपांतर केले असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. श्री गुरू दत्तात्रेय स्वामी बाबाबुदन दर्गा हे चिक्कमंगालुरू जिल्ह्यातील घनदाट जंगलात डोंगराच्या माथ्यावर वसलेले ऐतिहासिक मंदिर आहे. सरकारने कर्नाटकातील स्थानिक राजे आणि राज्यांवर अध्याय आणि थीम समाविष्ट करण्यासाठी पावले उचलली आहेत. 


पाठ्यपुस्तकांमध्ये पुन्हा सुधारणा करताना जिल्ह्यांचा स्थानिक इतिहास समाविष्ट करण्याचा विचार करू, असे ते म्हणाले. इयत्ता ६ ते १० च्या सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकांमध्ये स्थानिक राजे आणि राज्यांचे प्रकरण समाविष्ट केले आहेत. सध्या गंगा, होयसला, म्हैसूर वाडियार, विजयपुराची आदिलशाही, शतावाहन, कल्याणी चालुक्य, बहमनी, विजयनगर, सुरापुरा नायक, हैदर अली- टिपू सुलतान, तुळुनाडूचा इतिहास, येलहंका नादप्रभू आणि चित्रादुर्गचे नायक पाठ्यपुस्तकात अध्याय समाविष्ट आहेत.


यावरून ओवेसी यांनी आरएसएस- भाजप सरकारवर निशाणा साधला. आरएसएससाठी इस्लामशी संबंधित कोणतीही गोष्ट धार्मिक वाटते, परंतु ब्राम्हण धर्माशी संबंधित कोणतीही गोष्ट सांस्कृतिक-नैतिक वाटते. पण कलम २८ नुसार सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये धार्मिक शिक्षणावर बंदी आहे. 


आरएसएस इंग्रजांशी सहकार्य करत असताना, मुस्लिम उलेमा कुराण आणि हदीसने प्रेरित होऊन इंग्रजांशी लढले. भगवद्गीतेने काही लोकांना इंग्रजांविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली असेल, परंतु शालेय अभ्यासक्रमात ते अनिवार्य करण्यासाठी हे पुरेसे कारण नाही.  कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि म्हैसूरचे माजी मंत्री तन्वीर सैत यांनी सांगितले होते की, अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करणे कोविड महामारीपेक्षाही धोकादायक आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सत्यशोधनाची १५० वर्षे..
थयथयाट करणार्‍या खासदार नवनीत राणांविरोधात अजामीनपात्
राज्यातील शून्य ते वीस पटसंख्येच्या शाळांना लावणार कुल
राज्यातील ‘मिंधे’ सरकार दिल्लीचे वेठबिगार
अनु.जातीच्या तरुणाने मूर्तीला हात लावल्याने कुटुंबाला
उत्तर प्रदेशात सरकारी रुग्णालये गरिबांच्या उपचारात रस
सरना धर्म संहितेसाठी आदिवासी पुन्हा आंदोलन करणार
बालमृत्यू दरात थोडीशी घट आणि केंद्रातील आरएसएस सरकारने
मोहन भागवत यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे
खटला निकाली निघण्यास आणखी किती काळ लागणार?
‘आरएसएस’ पासून देश व संविधानाला धोका असल्याने मुख्यालय
आरएसएस मुख्यालयावरील मोर्चात देशभरातील भिक्खूंना सहभा
‘ब्राम्हणी’ आतंकवादाचा म्होरक्या मोहन भागवतांना ठरवले
कर्नाटक हिजाब वादावर युक्तिवाद पूर्ण
भाजपासमोर नतमस्तक झालो असतो तर इतके दिवस तुरुंगात राहाव
रूपयाच्या पुन्हा गटांगळ्या, भारतीय अर्थव्यवस्था डबघाईल
उद्या राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे पहिले राष्ट्रीय अध
टीआरपीसाठी वृत्तवाहिन्यांवर द्वेषयुक्त भाषेचा वापर
एसटी कर्मचार्‍यांचा पुळका आणणारे खोत, पडळकर, सदावर्ते आत
शिवाजी पार्कवर ठाकरेंचाच ‘आवाज’
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper