×

आरएसएस मुख्यालयावर ६ ऑक्टोबरला मोर्चा नेण्यासाठी देशातील ६०० जिल्ह्यात तयारी

Published On :    21 Sep 2022  By : MN Staff
शेयर करा:


संविधानाला वाचवण्यासाठी भारत मुक्ती मोर्चा मैदानात-वामन मेश्राम





नवी दिल्ली: आरएसएस मुख्यालयावर ६ ऑक्टोबरला मोर्चा नेण्यासाठी देशातील ६०० जिल्ह्यात तयारी सुरू असून हा मोर्चा संविधानाच्या कक्षेत राहून शांतीपूर्ण व अहिंसक पद्धतीने काढला जाणार आहे. त्यामुळे संविधानाला वाचवण्यासाठीच भारत मुक्ती मोर्चा मैदानात उतरला असल्याचे भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी स्पष्ट केले.


ते म्हणाले, काही दिवसांपूर्व मी घोषणा केली होती की, ६ ऑक्टोबरला आरएसएसच्या नागपूर मुख्यालयावर लाखो लोकांचा मोर्चा घेऊन जाऊ. कारण आरएसएसचे लोक, त्यांचे प्रशिक्षित कार्यकर्ते, आरएसएस लगातार संविधानाच्याविरोधात बोलतात. संविधानात अमेंडमेंट करण्याची व्यवस्था आहे. संविधानाचा कुठला अंश चुकीचा आहे तर, त्यामध्ये कमतरता असेल तर त्यामध्ये सुधार करण्याचे अमेंडमेंटची व्यवस्था आहे. 


त्यानंतरही ते अमेंडमेंटची बात करत नाहीत तर संविधान बदलण्याची भाषा करतात. संविधान समाप्त करण्याची भाषा करतात. यावरून सिद्ध होते की, हे लोक संविधानाला समाप्त करू इच्छितात. हे लोेक संविधानद्रोही आहेत. संविधानद्रोह तर देशद्रोह मानला जातो. त्यांच्यावर देशद्रोह चालवला जावा असे ते लोक आहेत.


संविधाद्रोही लोक असल्याने आम्ही यांच्याविरोधात राष्ट्रीय स्तरावरील मोर्चा घेऊन जाण्याची घोषणा केली होती. अशाप्रकारची घोषणा झाल्यानंतर देशभरात जवळजवळ ६०० जिल्ह्यात याची तयारी सुरू झाली आहे. एवढेच नाही तर आमच्या बाहेर असलेले तमाम एनजीओ आहेत, जिल्ह्या-जिल्ह्यातून त्या लोकांची आम्ही समिती बनवत आहोत. सार्‍या देशभरात समिती बनवली जात आहे. ते लोकदेखील साथ सहयोग करत आहेत. मोठ्या प्रमाणात साथ सहयोग करत आहेत. असे सारे देशात केले जात आहे. 


सार्‍या देशभरात तयारी होत असल्याने आजपर्यंत १ लाख १३ हजार लोक येणार असल्याची आकडेवारी आहे. त्यामध्ये आणखी लोक वाढू शकतात. मात्र आमचा उद्देश १ लाख लोकांचा मोर्चा घेऊन जायचा आहे. संविधानाच्या कक्षेत राहून शांतीपूर्ण व अहिंसक पद्धतीने हा मोर्चा घेऊन जाण्याची आमची योजना आहे. तशा पद्धतीने आम्ही काम करत आहोत. ही तयारी युद्धपातळीवर सुरूच ठेवावी असे देशभरातील कार्यकर्त्यांना आमचे आवाहन आहे. मोठ्या प्रमाणात तयारी सुरूच ठेवावी. लोकांना आणण्याची व्यवस्था करावी. 


हा राष्ट्रीय स्तरावरील संविधानाला वाचवण्याचा मोठा कार्यक्रम आहे. त्यामुळे एससी, एसटी, ओबीसी व मायनॉरिटीतील लोकांना हजारो वर्षापासून अधिकार नव्हता, त्या लोकांना संविधानाच्या माध्यमातून अधिकार मिळाला, तो अधिकार कायम रहायला हवा. सुरक्षित रहायला हवा. त्यासाठी हे आंदोलन व मोर्चा काढण्यात येणार आहे. आपण या मोर्चात सहभागी होण्यासाठी सार्‍या ताकदीनिशी तयारी करत असाल असा आशावाद मेश्राम यांनी व्यक्त केला.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सत्यशोधनाची १५० वर्षे..
थयथयाट करणार्‍या खासदार नवनीत राणांविरोधात अजामीनपात्
राज्यातील शून्य ते वीस पटसंख्येच्या शाळांना लावणार कुल
राज्यातील ‘मिंधे’ सरकार दिल्लीचे वेठबिगार
अनु.जातीच्या तरुणाने मूर्तीला हात लावल्याने कुटुंबाला
उत्तर प्रदेशात सरकारी रुग्णालये गरिबांच्या उपचारात रस
सरना धर्म संहितेसाठी आदिवासी पुन्हा आंदोलन करणार
बालमृत्यू दरात थोडीशी घट आणि केंद्रातील आरएसएस सरकारने
मोहन भागवत यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे
खटला निकाली निघण्यास आणखी किती काळ लागणार?
‘आरएसएस’ पासून देश व संविधानाला धोका असल्याने मुख्यालय
आरएसएस मुख्यालयावरील मोर्चात देशभरातील भिक्खूंना सहभा
‘ब्राम्हणी’ आतंकवादाचा म्होरक्या मोहन भागवतांना ठरवले
कर्नाटक हिजाब वादावर युक्तिवाद पूर्ण
भाजपासमोर नतमस्तक झालो असतो तर इतके दिवस तुरुंगात राहाव
रूपयाच्या पुन्हा गटांगळ्या, भारतीय अर्थव्यवस्था डबघाईल
उद्या राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे पहिले राष्ट्रीय अध
टीआरपीसाठी वृत्तवाहिन्यांवर द्वेषयुक्त भाषेचा वापर
एसटी कर्मचार्‍यांचा पुळका आणणारे खोत, पडळकर, सदावर्ते आत
शिवाजी पार्कवर ठाकरेंचाच ‘आवाज’
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper