×

महत्त्वाच्या साक्षीदाराला दोषी राधेश्याम शहाकडून धमकी

Published On :    22 Sep 2022  By : MN Staff
शेयर करा:


बिल्कीस बानो प्रकरण





बडोदा: गुजरात दंगलीतील बिल्कीस बानो बलात्कार प्रकरणातील एक दोषी राधेश्याम शहा याने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार या प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार इम्तियाझ घांची (४५) याने सरन्यायाधीशांकडे केली आहे. तसे एक पत्र घांची याने सरन्यायाधीश यू. यू. लळित यांना पाठवल्याचे वृत्त द क्ंिवटने दिले आहे. 


घांची याने केवळ सरन्यायाधीशच नव्हे तर गुजरातचे गृहसचिव, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, अनेक प्रशासकीय-पोलिस अधिकार्‍यांना पत्र पाठवून आपल्या शहा याच्याकडून जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे.


गेल्या १५ सप्टेंबरला राधेश्याम शहा याने आपल्याला गाव सोडून जात नाहीपर्यंत काळानिळा होईल इतके मारू अशी धमकी दिल्याचे घांची याचे म्हणणे आहे. १५ सप्टेंबरला घांची याची पिपलोड रेल्वे बॅरिकेड येथे शहा याच्याशी नजरानजर झाली. 


त्यावेळी घांची आपल्या मोटार सायकलवरून देवगड बारीया या आपल्या गावाकडे जात होता. पण मध्ये रेल्वे फाटक असल्याने तो सिग्नलवर थांबला असता शहा याने घांची याला पाहिले आणि त्याला खुणेने जवळ बोलावले. घांची शहाच्याजवळ आला. शहा आपल्या कारमध्ये बसला होता. त्याने आता आपण तुरुंगातून बाहेर आलेलो असून तुम्हा लोकांना (घांची) मारून गावाबाहेर हाकलून देणार अशी धमकी दिल्याचे घांचीचे म्हणणे आहे.


२००२ च्या गुजरात दंगल उसळल्यानंतर घांची याने आपल्या कुटुंबासह सिंगवाड (रंधिकपूर) येथून देवगढ बरिया या गावाकडे पलायन केले होते. त्यानंतर तो आजही आपली पत्नी व मुलांसह तेथेच राहतो. गुजरात दंगलीनंतर पुन्हा गावाकडे जाण्यास भीती वाटते. आपण रोजंदारीवर काम करत असल्याने अनेकदा कामासाठी गावागावांत फिरावे लागते असे घांची याचे म्हणणे आहे.


गोध्रा हत्याकांड प्रकरणात घांची याने साक्षीदार म्हणून सीबीआयकडे जबाब नोंदवला होता. गोध्रा हत्याकांडातील एक आरोपी नरेश मोडधिया (आता मृत) याच्या हातात दंगलीदरम्यान रामपुरी चाकू होता, अशी साक्ष घांची याने दिली होती. तसेच घांची याने दंगलीतील अन्य एक आरोपी प्रदीप मोडधिया हा रंधिकपूर येथे काही घरांवर दगडफेक करत होता व घोषणा देत असल्याचा जबाब न्यायालयापुढे दिला होता.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सत्यशोधनाची १५० वर्षे..
थयथयाट करणार्‍या खासदार नवनीत राणांविरोधात अजामीनपात्
राज्यातील शून्य ते वीस पटसंख्येच्या शाळांना लावणार कुल
राज्यातील ‘मिंधे’ सरकार दिल्लीचे वेठबिगार
अनु.जातीच्या तरुणाने मूर्तीला हात लावल्याने कुटुंबाला
उत्तर प्रदेशात सरकारी रुग्णालये गरिबांच्या उपचारात रस
सरना धर्म संहितेसाठी आदिवासी पुन्हा आंदोलन करणार
बालमृत्यू दरात थोडीशी घट आणि केंद्रातील आरएसएस सरकारने
मोहन भागवत यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे
खटला निकाली निघण्यास आणखी किती काळ लागणार?
‘आरएसएस’ पासून देश व संविधानाला धोका असल्याने मुख्यालय
आरएसएस मुख्यालयावरील मोर्चात देशभरातील भिक्खूंना सहभा
‘ब्राम्हणी’ आतंकवादाचा म्होरक्या मोहन भागवतांना ठरवले
कर्नाटक हिजाब वादावर युक्तिवाद पूर्ण
भाजपासमोर नतमस्तक झालो असतो तर इतके दिवस तुरुंगात राहाव
रूपयाच्या पुन्हा गटांगळ्या, भारतीय अर्थव्यवस्था डबघाईल
उद्या राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे पहिले राष्ट्रीय अध
टीआरपीसाठी वृत्तवाहिन्यांवर द्वेषयुक्त भाषेचा वापर
एसटी कर्मचार्‍यांचा पुळका आणणारे खोत, पडळकर, सदावर्ते आत
शिवाजी पार्कवर ठाकरेंचाच ‘आवाज’
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper