×

केंद्रातील आरएसएसप्रणित भाजपा सरकारने इस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस वे कॅनडाच्या कंपनीला विकला

Published On :    20 Nov 2022  By : MN Staff
शेयर करा:


रेल्वे, बँका, एलआयसी, ऑईल कंपन्या, एअर इंडियानंतर केंद्राची आता एक्स्प्रेस वे कडे वक्रदृष्टी





नवी दिल्ली: केंद्रातील आरएसएसपप्रणित भाजपा सरकारने भारतीय रेल्वे, बँका, एलआयसी, ऑईल कंपन्या, एअर इंडिया विकल्यानंतर केंद्राने आता एक्स्प्र वे कडे वक्रदृष्टी वळवली आहे. इस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस वे कॅनडाच्या कंपनीला विकून करोडोंची कमाई करण्याचा घाट घालण्यात आला आहे.


 कॅनेडियन पेन्शन फंड सीडीपीक्यूद्वारे भारतातील रस्त्यांमध्ये गुंतवणूक करणार्‍या एक प्लटफॉर्म असलेल्या मॅपल हायवेजने दिल्ली एनसीआर ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवे ६ हजार २६७ कोटींनी खरेदी केला आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे ईपीई विकली गेली पण कॉर्पोरेट मीडिया हाऊसने त्यावर चर्चाही केली नाही. 


भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या टोल ऑपरेट ट्रान्सफर प्रकल्पाची ही खरेदी सरकारच्या मालमत्ता मुद्रीकरण योजनेअंतर्गत या वर्षातील सर्वात मोठा करार आहे. १३५ किमी लांबीचा ६ लेन एक्सप्रेस हायवे २०१८ पासून कार्यरत आहे. दिल्लीतील व्यावसायिक वाहनांपासून रस्त्यावरील जाम दूर करण्यासाठी त्याची रचना तयार करण्यात आली होती. हा रस्ता दिल्ली एनसीआरच्या पूर्व भागात हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधून जातो. सीडीपीक्यू हा जगातील दुसरा सर्वात मोठा संस्थात्मक गुंतवणूकदार आहे.


मॅपल हायवे आणि सीडीपीक्यूद्वारे जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की आमची कंपनी दीर्घकालीन शेअरहोल्डिंग मूल्य ऑफर करण्याच्या संधी शोधत राहील आणि रहिवासी क्षेत्रात अशा रस्त्यांमध्ये गुंतवणूक करेल. पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या बाबतीत सीडीपीक्यू हा जगातील दुसरा सर्वात मोठा संस्थागत गुंतवणूकदार आहे, त्याच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात ४५ अब्ज कॅनेडियन डॉलर्सची निव्वळ मालमत्ता आहे. 


यासह, कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्डची निव्वळ मालमत्ता ३० सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या वित्तीय वर्ष २३ च्या दुसर्‍या तिमाहीत  ५२९ अब्ज झाली आहे, जी मागील तिमाहीच्या शेवटी  ५२३ अब्ज होती. कोटक इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट फंडच्या पहिल्या क्लोजसाठी कॅनेडियन फर्मने रु.१ हजार ८५० कोटी गुंतवणूक करण्याचे सांगितले आहे. केआयआयएफची स्थापना कोटक गुंतवणूक सल्लागारांकडून केली जात आहे जी भारतातील पायाभूत सुविधा क्षेत्रातील प्रकल्पांना वित्तपुरवठा करेल. नॅशनल हायवेज इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्टमध्ये ३५७.५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. जो भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रायोजित केलेला पायाभूत गुंतवणूक ट्रस्ट आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सब नंगाशी तर मग पतंजली जिन्स हवी कशाला ?
राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग रद्द करण्यावर संसदेत च
‘द कश्मीर फाइल्स’ व्हल्गर आणि प्रोपगंडा : नदव लॅपिडच्या
उमर खालिद आणि खालिद सैफीची निर्दोष मुक्तता
एससी समुदायातील ६ विद्यार्थ्यांकडून करून घेतली शाळेतील
वन संवर्धन नियम २०२२ मुळे आदिवासींच्या अधिकारावर घाला
‘राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव’ मोहीम
तोंडाने विष्ठा करणारा रेशिम बागेतील किडा
वेदमंत्रांच्या घोषात एनसीबीसीची सूत्रे स्विकारली: हंसर
छत्तीसगडमध्ये आता ७६ टक्के आरक्षण
आरोपमुक्तीच्या याचिकेवर सुनावणी का करू?
पॉक्सो कायद्याची १० वर्षे: जलदगती न्यायालये सुस्त
देश आता पुन्हा विकृत लोकांच्या हातात गेलाय
देशातील बेरोजगारीत वाढ; नोव्हेंबरमध्ये दर ८ टक्क्यांवर,
‘ब्राह्मण भारत छोडो’
संभाजीराजेंच्या संघटनेने भगतसिंग कोश्यारींना काळे झें
कोश्यारी उघड माथ्याने, काळे झेंडे दाखवणारे पोलिसांच्या
भारतात शिक्षणाचा बट्ट्याबोळ, ६६ टक्के शाळांमध्ये इंटरन
पेशवाई म्हणजे जहरी जोडगोळी...!
महाराष्ट्रातही समान नागरी कायदा लागू करण्याचे तुणतुणे
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper