×

दर ११ व्या मिनिटाला एका ‘श्रद्धा’चा होतो मृत्यू

Published On :    22 Nov 2022  By : MN Staff
शेयर करा:


संयुक्त राष्ट्र संघाचे प्रमुख एंटोनियो गुटेरेस यांचे स्पष्टीकरण





नवी दिल्ली: भारतात श्रद्धा वालकरची झालेली हत्या गंभीर चर्चेचा विषय झाली आहे. श्रद्धाच्या झालेल्या हत्याकांड प्रकरणात तिचा बॉयफ्रेंड हा मुख्य आरोपी आहे. श्रद्धा हत्याकांडसारखीच अनेक प्रकरणं आता समोर येऊ लागली आहेत. त्या प्रकरणामधून कधी बॉयफ्रेंड, कधी नवरा तर कधी प्रियकरानेच आपल्या जोडीदाराला संपवले आहे. 


संयुक्त राष्ट्र संघाचे प्रमुख एंटोनियो गुटेरेस यांनी एक धक्कादायक स्पष्टीकरण दिले आहे. गुटेरेस यांनी सांगितले की, दर ११ व्या मिनिटाला एका महिलेची हत्या केली जाते, आणि या अशा प्रकरणात जास्त करुन कधी घरातीलच लोकं असतात तर कधी महिलेचे पार्टनरच तिचा जीव घेतात अशीही माहितीही त्यांनी दिली आहे.


हे पण वाचा: श्रद्धाच्या हत्येसारख्या अनेक घटना घडतात, मात्र त्याची नोंदच होत नाही-भारतात महिलांची सुरक्षा धोक्यात



महिला हत्याकांड प्रकरणाविषयी माहिती देताना एंटोनिया गुटेरेस यांनी सांगितले की, महिलांविरोधात घडणार्‍या या हिंसा मानवाधिकारविरोधी आहेत. त्यांच्या जगण्याचे हक्क बळकावण्याचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यासाठी देशातील अस्तित्वात असलेल्या सरकारनी त्यासाठी राष्ट्रीय कृती आरखडा तयार करण्याचा सल्ला दिला आहे. गुटेरेस यांनी हे २५ नोव्हेंबर रोजी होणार्‍या ‘महिलांवरील हिंसाचाराचे उच्चाटन’ या कार्यक्रमाआधीच त्यांनी हे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यांनी सांगितले की दर ११ व्या मिनिटाला होणार्‍या महिला हत्याकांडामध्ये तिचा जोडीदार किंवा तिच्याच घरातील लोकं तिला संपवत असतात असंही त्यांनी यावेळी सांगितले.


महिला ऑनलाईन पद्धतीनेही त्यांचे शोषण केले जात आहे. महिलांच्या विरोधात घाणेरडी शेरेबाजी करणे, पोर्नोग्राफी, लैंगिक शोषण आणि त्यांचे फोटो घेऊन त्यामध्ये नको ते बदल करणे या सारख्या घटना आता सर्रासरपणे केल्या जात आहेत. या अशा प्रकारामुळे महिला आणि मुलींच्या आयुष्यावर विपरित परिणाम होत आहेत. अशा गोष्टींमुळे मुक्तपणे जीवन जगण्यावर मर्यादा पडतात. तसेच यामुळे त्यांच्या मुलभूत अधिकारांवर त्याचा वाईट परिणाम होत असल्याचेही त्यांनी सांगितले. 


महिलांच्या होणार्‍या हत्येमुळे एंटोनिया गुटेरेस यांनी अनेक देशातील सरकाराने त्यांनी जाहीर आवाहन केले आहे की, महिला आणि मुलींविरोधोत घडणार्‍या वाईट घटनाविरोधात कडक पावले उचला. यासाठी प्रत्येक देशातील सत्ताधारी लोकांनी सामान्य माणसांची मदत घेऊन राष्ट्रीय पातळीवर राबवण्यासाठी एक राष्ट्रीय कृती आरखडा बनवा. कायद्याचे उल्लंघन होणार नाही. त्याबरोबरच महिलांसाठी काम करणार्‍या ज्या ज्या विविध संघटना आहेत, त्यांचा निधी वाढवण्या संदर्भातही विचार केला जावा अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
‘स’ समागम आणि ‘म’ चा माफीनामा...!
सब नंगाशी तर मग पतंजली जिन्स हवी कशाला ?
राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग रद्द करण्यावर संसदेत च
‘द कश्मीर फाइल्स’ व्हल्गर आणि प्रोपगंडा : नदव लॅपिडच्या
उमर खालिद आणि खालिद सैफीची निर्दोष मुक्तता
एससी समुदायातील ६ विद्यार्थ्यांकडून करून घेतली शाळेतील
वन संवर्धन नियम २०२२ मुळे आदिवासींच्या अधिकारावर घाला
‘राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव’ मोहीम
तोंडाने विष्ठा करणारा रेशिम बागेतील किडा
वेदमंत्रांच्या घोषात एनसीबीसीची सूत्रे स्विकारली: हंसर
छत्तीसगडमध्ये आता ७६ टक्के आरक्षण
आरोपमुक्तीच्या याचिकेवर सुनावणी का करू?
पॉक्सो कायद्याची १० वर्षे: जलदगती न्यायालये सुस्त
देश आता पुन्हा विकृत लोकांच्या हातात गेलाय
देशातील बेरोजगारीत वाढ; नोव्हेंबरमध्ये दर ८ टक्क्यांवर,
‘ब्राह्मण भारत छोडो’
संभाजीराजेंच्या संघटनेने भगतसिंग कोश्यारींना काळे झें
कोश्यारी उघड माथ्याने, काळे झेंडे दाखवणारे पोलिसांच्या
भारतात शिक्षणाचा बट्ट्याबोळ, ६६ टक्के शाळांमध्ये इंटरन
पेशवाई म्हणजे जहरी जोडगोळी...!
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper