×

शेतकरी आत्महत्या हा काही नवीन विषय नाही

Published On :    13 Mar 2023  By : MN Staff
शेयर करा:


कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकर्‍यांची उडवली टिंगल





मुंबई: आस्मानी संकटाने शेतकर्‍यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेलता गेला असतानाच राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकरी आत्महत्या हा काही नवीन विषय नाही असे सांगत शेतकर्‍यांची टिंगल उडवली आहे. सत्तार यांनी बेजबाबदार विधान केल्याने विरोधकही आक्रमक झाले आहेत.


एकीकडे तरूण बेरोजगारीमुळे त्रस्त असताना शेतकरी आस्मानी संकटात सापडला आहे. अवकाळी पावसाने दाणादाण उडवल्याने शेतकर्‍यांचे गहू, मका, हरभरा, भाजीपाला, फळबागा आदींचे नुकसान झाले. धक्कादायक बाब म्हणजे कृषीमंत्र्यांच्या औरंगाबाद जिल्ह्यात आठवड्यात ७ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. एकट्या सिल्लोडमध्ये ४ जणांनी जीवन संपवले. त्यामुळे सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यादरम्यान सत्तार यांनी सोयगावमधील नुकसानीची पाहणी केली. तेथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केले.


शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा काही आजचा विषय नाही. अनेक वर्षापासून शेतकरी आत्महत्या करत आहेत असे विधान सत्तार यांनी केले. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये संतापाचे वातावरण असून विरोधकांनीही हा मुद्दा उचलून धरला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा नवीन विषय नाही. त्या नेहमीच्याच आहेत अशाप्रकारे कृषीमंत्री वक्तव्य करत असतील तर राज्य सरकार शेतकर्‍यांकडे कसे पाहतेय हे समोर आले आहे. हे राज्य सरकार शेतकर्‍यांची काळजी न घेणारे आहे. राज्य सरकार शेतकरीविरोधी धोरण राबवत असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, छत्रपती क्रांत
शरद पवार आणि वामन मेश्राम एका मंचावर येण्याने भारतातील व
राजकारणात कधी सत्ता येते पण, जाते पण, पाय जमिनीवर चिकटून र
सर्व प्रमुख बँकांमधील कर्मचारी एकाच वेळी देशभरात संपाव
राष्ट्रीय महापरिवर्तन मोर्चाची स्थापना, 32 प्रादेशिक पक्
महिला आरक्षण विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची
बँकांपासून ते गॅस सिलेंडरपर्यंत पुन्हा सर्वसाामान्यां
ठाणे जिल्हयात कुपोषित बालकांची संख्या वाढली, तर ऑगस्ट 2023
जन्माचा दाखला देशभरात महत्त्वाचा पुरावा, आता आधार कार्ड,
साता़रात इ.स. १९१९ पर्यंत शिवाजी महाराजांची वाघ नखे असल्
भाजपा सरकार लवकरच बुडणार, आरएसएस संघटना आणि भाजपा सरकारच
भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून सातत्याने कर्ज काढून जन
भाजपा नेत्यांची 80 टक्के भडकाऊ व जातीयवादी वक्तव्ये आणि ध
विदर्भ व मराठवाड्यात 28 लाख लोकांना पैसे घेऊन ओबीसी जात प्
जगात तिसऱ्या महायुद्धाची शक्यता, युुनोला युद्ध थांबवण्
नेत्यांकडून मुस्लिम द्वेषात व मुस्लिम धर्माविषयी वादग्
नथूराम गोडसेंचा अखंड भारताचा विचारच भारतीयांच्या मनात
देशातील तरुणांना तुमची स्वप्ने नको आहेत, त्यांच्या हाता
महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या सरकारकडून जाणुनबुजून स
2 वर्षात डेंग्यूच्या आजाराने 600 मृत्यू, तर 4 लाख लोकांना डे
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper